साताऱ्यात वीज पडून नारळाची दोन झाडे पेटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:49 AM2021-04-30T04:49:39+5:302021-04-30T04:49:39+5:30
शहरात सकाळपासूनच ढगाळ वातावरण आहे. दुपारनंतर जोरदार वारा सुरू झाला. विजेचा कडकडाटदेखील सुरू होता. दुपारी चारच्या सुमारास अचानक विजेचा ...
शहरात सकाळपासूनच ढगाळ वातावरण आहे. दुपारनंतर जोरदार वारा सुरू झाला. विजेचा कडकडाटदेखील सुरू होता. दुपारी चारच्या सुमारास अचानक विजेचा मोठा व भीतीदायक आवाज झाला. ही वीज शनिवार पेठेतील एका नारळाच्या झाडावर पडली. नारळाच्या झाडाने क्षणात पेट घेतला. जळालेल्या फांद्या बाजूच्या घरांवर पडत होत्या. लोकांनी प्रसंगावधान राखून झाडावरची आग विझविण्याचा प्रयत्न सुरू केला. पाऊसही सुरू झाल्याने विझली.
मात्र, जोरदार पावसामुळे परिसरातील विजेची उपकरणे खराब झाली आहेत. दुपारी आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स या दोन टीममध्ये सामना रंगला होता. अनेकजण टीव्हीवर सुरू असलेला हा सामना बघण्यात रंगले होते, तेवढ्यात टीव्ही बंद पडले, ते पुन्हा चालू झालेच नाहीत. मात्र, आग वेळीच आटोक्यात आल्याने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
फोटो आहे : सातारा शहरातील शनिवार पेठेत नारळाच्या झाडावर वीज पडून झाडाने असा पेट घेतला होता.
(छाया : सागर गुजर)