Satara: घरोघरी टाकून पेपर ‘त्या’ने गाठले यशाचे शिखर!, लिंबच्या विशाल जगतापची ‘सीए’ परीक्षेत बाजी

By सचिन काकडे | Published: July 12, 2023 12:32 PM2023-07-12T12:32:46+5:302023-07-12T12:33:24+5:30

सातारा : जिद्द अन् चिकाटी असेल तर आपण यशाचं शिखर नक्कीच गाठू शकतो. हेच शिखर गाठून दाखवलंय लिंब येथे ...

Limb Vishal Jagtap passed the CA exam by leaving home | Satara: घरोघरी टाकून पेपर ‘त्या’ने गाठले यशाचे शिखर!, लिंबच्या विशाल जगतापची ‘सीए’ परीक्षेत बाजी

Satara: घरोघरी टाकून पेपर ‘त्या’ने गाठले यशाचे शिखर!, लिंबच्या विशाल जगतापची ‘सीए’ परीक्षेत बाजी

googlenewsNext

सातारा : जिद्द अन् चिकाटी असेल तर आपण यशाचं शिखर नक्कीच गाठू शकतो. हेच शिखर गाठून दाखवलंय लिंब येथे राहणाऱ्या विशाल मारुती जगताप (३४ ) या तरुणाने. सलग सात वर्षे घरोघरी पेपर टाकणारा विशाल आज सीए (सनदी लेखापाल) परीक्षा उत्तीर्ण झालाय. हे यश मिळवून त्याने आपल्या शेतकरी आई-वडीलांची स्वप्नपूर्ती तर केलीच शिवाय गावातील पहिला सनदी लेखापाल बनण्याचा मानही मिळविला.

आपल्या मुलानं ‘सीए’ बनावं हे  स्वप्न विशालच्या वडीलांनी पाहिलं होतं. त्यामुळे विशालच्या शिक्षणात कोणताही खंड पडू नये म्हणून त्यांचे कुटुंबं लिंबहून साताऱ्यात स्थायिक झाले. साताऱ्यात आल्यानंतर त्याने धनंजयराव गाडगीळ कॉलेज ऑफ कॉमर्स कॉलेमध्ये अकरावी वाणिज्य शाखेत प्रवेश घेतला. मात्र, गेम झोनचे व्यसन जडल्याने तो अकरावीलाच नापास झाला. त्यामुळे पुढे त्याला बारावी पर्यंतचे शिक्षण कला शाखेतून घ्यावे लागले. दरम्यान, शिक्षण घेत असताना त्याच्या वडीलांनी ‘काम करुन शिक्षण घे. तुला नवीन अनुभव मिळतील’ अशी इच्छा विशालपुढे व्यक्त केली अन् विशालने साताऱ्यातील वृत्तपत्र विक्रेते ताजुद्दिन आगा यांच्याकडे पेपर टाकण्याची नोकरी पत्करली. भल्या पहाटे उठणे, घरोघरी जावून पेपर टाकणे, दिवसभर अभ्यास करणे असा त्याचा दिनक्रम सलग सात वर्षे सुरू होता.

पेपर टाकताना रोजच्या घडामोडी त्याला समजू लागल्या. वाचनाची अन् अभ्यासाठी आवड वाढत गेली. मिळणाºया पैशातून पुस्तकांचा खर्च निघू लागला. बारावी नंतरचे शिक्षण वाणिज्य शाखेतून घेताना विशालने ‘सीए’ परीक्षेची तयारी सुरू केली. प्रचंड अभ्यास करुनही त्याला यश सातत्याने हुलकावणी देत होते. अखेर तो दिवस आला अन् विशालने २०२३ मध्ये ‘दि इन्स्टिटयूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया’च्या वतीने घेण्यात आलेल्या   परीक्षेत यशाला गवसणी घातली. विशाल ‘सीए’ झाला असून, त्याने आपल्या आई-वडीलांचे स्वप्नही साकार केले. त्याला सीए. सत्यजित भोसले व सीए. ओंकार तिखे यांचे मार्गदर्शन लाभले.

यशाला कोणताही शॉर्टकट नाही. यश मिळविण्यासाठी तुम्हाला कठोर मेहनत घ्यावीच लागते शिवाय अभ्यासालाही वेळ द्यावा लागतो. घरोघरी वृत्तपत्र टाकण्याचे काम सात वर्षे केले. हे काम मला कितीतरी अनुभव देऊन गेले. माझ्या या यशात कुटुंबीय व मार्गदर्शकांचे योगदान मोलाचे आहे. अपयश आल्यास तरुणांनी खचून जावू नये.  - विशाल जगताप, लिंंब

Web Title: Limb Vishal Jagtap passed the CA exam by leaving home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.