कोरोनामध्ये जिंती गावात दारू व्यवसाय जोमात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:37 AM2021-05-17T04:37:55+5:302021-05-17T04:37:55+5:30
जिंती : फलटण तालुक्यातील जिंती गावामध्ये गेल्या महिन्यापासून कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मृत्यूच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ ...
जिंती : फलटण तालुक्यातील जिंती गावामध्ये गेल्या महिन्यापासून कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मृत्यूच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. गावामध्ये लॉकडाऊन केले असले तरी दारू व्यवसाय जोमात सुरू असल्याने परिसरात लोकांची दारू पिण्यासाठी झुंबड उडाली आहे. अनेकवेळा पोलिसांना सांगूनही दारू व्यवसाय कसा चालतो असा प्रश्न नागरिकांतून निर्माण होत आहे. ग्रामपंचायतीत एकमताने दारूबंदी ठराव मंजूर करून सातारा एसीपी कार्यालयामध्ये व फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार देऊनही दारू व्यवसाय अजूनही बंद होण्याचे दिसून येत नाही.
सध्या कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. गावामध्ये बफर झोन प्रशासनाने घोषित केला आहे. अत्यावश्यक दुकाने बंद आहेत, पण दारू व्यवसाय सुरू आहेत. गेल्या आठ दिवसांपूर्वी पोलीस दारू व्यावसायिकांच्या घरी गेले होते पण त्याठिकाणी कारवाई झाली की नाही? असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित होत आहे. तसेच फलटण तालुक्यात कोरोना साखळी तोडण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. यामध्ये दारू व्यावसायिकांनी पोलिसांच्या नाकावर टिच्चून धंदे सुरू ठेवले आहेत. दारू धंदे करणाऱ्या व्यक्तीकडे पोलीस जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. दारूमुळे अनेक संसार उघड्यावर पडले आहेत. यावर जिल्हा पोलीसप्रमुख अजयकुमार बन्सल यांनी ठोस निर्णय घेऊन कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
चौकट :
गेल्या कित्येक वर्षांपासून जिंतीमधे अनेक दारू व्यवसाय सुरू आहेत. यांच्यावर अनेक गुन्हे दाखल झाले आहेत. यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल आहेत. मोक्का लावण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.
एक कोट येणार आहे...