दारू दुकानाचा परवाना देण्यावरून फसवणूक, राज्य गुन्हे शाखेच्या पुणे अप्पर पोलीस अधीक्षकांसह नऊ जणांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2024 12:23 PM2024-07-19T12:23:14+5:302024-07-19T12:24:42+5:30

महाबळेश्वर येथील हॉटेल व्यावसायिकाची फसवणूक : वाई पोलिसांत गुन्हा दाखल

Liquor Shop Licensing Fraud, A case has been registered against nine persons including the Pune Upper Superintendent of Police of the State Crime Branch | दारू दुकानाचा परवाना देण्यावरून फसवणूक, राज्य गुन्हे शाखेच्या पुणे अप्पर पोलीस अधीक्षकांसह नऊ जणांवर गुन्हा दाखल

दारू दुकानाचा परवाना देण्यावरून फसवणूक, राज्य गुन्हे शाखेच्या पुणे अप्पर पोलीस अधीक्षकांसह नऊ जणांवर गुन्हा दाखल

वाई : वाइन्स शॉप्सचा परवाना मिळवून देण्याचे आश्वासन देऊन त्याच्या खर्चासाठी एक कोटी पाच लाख रुपयांची रक्कम घेऊन महाबळेश्वर येथील हॉटेल व्यावसायिकाची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी राज्य गुन्हे शाखेचे अपर पोलिस अधीक्षक (पुणे विभाग) श्रीकांत कोल्हापुरे यांच्यासह नऊजणांवर वाई पोलिस ठाण्यात गुन्हा झाला आहे. यामुळे पोलिस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे.

याबाबत मध्यस्थ संजय साळुंखे यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेत पुणे विभाग आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिस उपअधीक्षक देवश्री मोहिते यांनी सोमवारी (ता. १५) वाई पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. यामध्ये महाबळेश्वर (साबणेरोड) येथील मेघदूत हॉटेलचे मालक हेमंत बाळकृष्ण साळवी यांना राज्य गुन्हे अन्वेषण शाखा पुणे विभाग अपर पोलिस अधीक्षक (ए.ट.प.) श्रीकांत कोल्हापुरे, हनुमंत विष्णुदास मुंडे व विवेक पंडित यांनी फिली-चिली वाइन्स शॉपचा परवाना मिळवून देण्याचे आश्वासन देऊन त्यासाठी एकूण अडीच कोटी रुपयांची मागणी केली.

या कामाकरिता वेळोवेळी संजय बाजीराव साळुंखे यांच्या मध्यस्थीने एकूण रक्कम १ कोटी ५० लाख रुपये रोख व चेकने वाई येथे विविध ठिकाणी स्वीकारली. परंतु त्यांना आजपर्यंत कोणत्याही प्रकारचे लायसन्स मिळवून दिले नाही. त्यामुळे त्यांची आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे संजय सांळुखे यांनी अपर पोलिस महासंचालक, पुणे यांच्याकडे तक्रार अर्ज केला होता. या अर्जाच्या चौकशीनंतर सदर गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आला आहे.

या अर्जानुसार अपर पोलिस अधीक्षक (ए.ट.प.) श्रीकांत कोल्हापुरे व हनुमंत मुंडे यांच्यासह नीलेश पटेल, अभिमन्यू देडगे, विवेक पंडित, राजन सूर्यभान सोनवणे, शकील हाजी मकबूल, सय्यद श्रीमती नजमा शेख व बाळू पुरी अशा नऊजणांवर आपापसात संगनमत करून, शासकीय वाहनाचे लॉक बुकमध्ये खोट्या नोंदी करून, हेमंत साळवी यांच्या आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी वाई पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पुणे विभाग आर्थिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ अधिकारी करीत असल्याची माहिती वाई पोलिसांनी दिली.

Web Title: Liquor Shop Licensing Fraud, A case has been registered against nine persons including the Pune Upper Superintendent of Police of the State Crime Branch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.