साक्षरतेचा संदेश

By admin | Published: September 9, 2016 12:55 AM2016-09-09T00:55:17+5:302016-09-09T00:55:27+5:30

निफाड : जागतिक साक्षरता दिनानिमित्त साक्षरता फेरी

Literacy message | साक्षरतेचा संदेश

साक्षरतेचा संदेश

Next

पेट्री : कास पठारावर नेहमीच पर्यटकांची वर्दळ सुरू असून शनिवार, रविवारी व सुटीच्या दिवशी पर्यटकांची मोठ्या संख्येने गर्दी होत आहे. फुलांच्या पंढरीत गेंद, तेरडा, सीतेची आसवे फुले बहुतांश ठिकाणी चांगल्या प्रकारे फुललेली आहेत. ही तिन्ही प्रकारची फुले एकत्रित गालिच्यात पाहणे ही पर्यटकांसाठी आनंदाची पर्वणी असते. काही ठिकाणी असे गालिचे दिसावयास सुरुवात होऊ लागली आहे.
पठारावर वेगवेगळ्या प्रकारची फुले बहुतांश ठिकाणी आली असून, सत्तर टक्के फुले फुललेली आहेत. काही ठिकाणी विविधरंगी एकत्रित फुलांच्या गालिच्यास सुरुवात होत आहे.
परंतु यासाठी पठारावर वातावरण फुलांच्या दृष्टीने पोषक राहणे आवश्यक आहे. तसेच जास्त पाऊस, ढगाळ वातावरण व धुके असल्यास हंगामास मारक ठरत असून, जास्त कडक ऊन जरी असले तरी ते मारक ठरते.
यासाठी ऊन व पाऊस दोन्ही एकत्रित असल्यास फुलांसाठी पोषक ठरते. (वार्ताहर)

Web Title: Literacy message

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.