पालखीमार्गावरून थेट संघर्षमार्गावर...

By admin | Published: February 24, 2015 10:50 PM2015-02-24T22:50:05+5:302015-02-25T00:08:31+5:30

मसूरमध्ये तणाव : पोलीस ठाणे, ग्रामपंचायतीसमोर धनगर समाजाचा ठिय्या

Live on the lane route ... | पालखीमार्गावरून थेट संघर्षमार्गावर...

पालखीमार्गावरून थेट संघर्षमार्गावर...

Next

मसूर : येथील बिरोबा मंदिराकडे जाणारा पालखीमार्ग एका शेतकऱ्याने अडविल्यामुळे हे प्रकरण संघर्षाच्या मार्गावर निघाले होते. संतापलेल्या धनगर समाजाने पालखी मंदिरातच ठेवण्याचा निर्णय घेत मसूर पोलीस व ग्रामपंचायत कार्यालयासमोर ठिय्या दिला. पोलीस, राजकीय पदाधिकारी, समाजबांधव व संबंधित शेतकरी यांच्यात बैठक होऊन तोडगा निघाल्याने धार्मिक तणाव निवळला.
धनगर समाजाच्या वतीने सांगण्यात आले की कराड-मसूर रस्त्यापासून जवळच धनगर समाजाचे श्री बिरोबा देवस्थान आहे. त्याठिकाणी ३०० वर्षांपासून यात्रा भरते. या देवस्थानकडे जाण्यासाठी एक रस्ता आहे. तो सर्व्हे नंबर व नकाशावर आहे. तो रहदारीसाठी खुला करावा, यासाठी तहसीलदार धनगर समाजाच्या स्वाक्षऱ्यांचे निवेदन दिले आहे. त्यामुळे ‘तुम्ही सह्या का केल्या,’ या कारणावरून चिडून जाऊन एका शेतकऱ्याने पालखी रस्ता अडवला. अरेरावी व शिवीगाळ केली. तसेच शुभेच्छा फलकही फाडले. तरीही धनगर समाजातील लोकांनी मंगळवार व बुधवार रोजी यात्रेचे दिवस असल्याने त्यास विरोध न करता वादविवाद नको म्हणून पालखी तेथे ठेवून रात्री २ वाजता शेकडो धनगर बांधवांनी मसूर पोलीस दूरक्षेत्रासमोर ठिय्या ठोकला. त्यानंतर आज मंगळवारी सकाळी न्यायासाठी मसूर ग्रामपंचायतीसमोर धरणे धरले. (वार्ताहर)

Web Title: Live on the lane route ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.