कर्जमाफीप्रकरणात तत्कालीन चेअरमन, सचिवावर गुन्हा दाखल

By admin | Published: March 19, 2015 08:49 PM2015-03-19T20:49:06+5:302015-03-19T23:53:43+5:30

लिंब सोसायटी : दफ्तर गहाळप्रकरणी कारवाईकडे लक्ष

In the loan forgery case, the Chairman, the Secretariat filed the complaint | कर्जमाफीप्रकरणात तत्कालीन चेअरमन, सचिवावर गुन्हा दाखल

कर्जमाफीप्रकरणात तत्कालीन चेअरमन, सचिवावर गुन्हा दाखल

Next

सातारा : तालुक्यातील राजकीयदृ्ष्ट्या संवेदनशील म्हणून लिंब गावचा उल्लेख होतो. याच लिंब मधील विकास सेवा सोसायटीचे दप्तर गहाळ केल्याप्रकरणी सातारा तालुका उपनिबंधक कार्यालयाने अखेर सोसायटीच्या तत्कालीन सचिव आणि चेअरमनवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, याबाबतच्या कारवाईकडे आता सहकार क्षेत्राचे लक्ष लागून राहिले आहे.लिंबमधील विकास सेवा सोसायटीचे सभासद तुळशीदास नामदेव पवार यांना केंद्र शासन कर्जमाफी मिळाली होती. अंतर्गत २००८ मध्ये १७८२ रुपये कर्जमाफी मिळाली होती. तसेच राज्य शासन कर्जमाफ अंतर्गत वीस हजार रुपये कर्जमाफी मिळाली होती. पवार यांना मिळालेल्या कर्जमाफी रकमेचा अपहार करण्यात आला. या अपहारास जबाबदार असणारे सोसायटीचे तत्कालीन सचिव दत्तात्रय पांडुरंग निकम व तत्कालीन चेअरमन यांच्यावर कारवाई करण्यासंदर्भात भाजपा सातारा तालुका सरचिटणीस राजेश शेटे यांनी तक्रार दाखल केली होती.दरम्यान, या कर्जमाफी अपहारासंदर्भात दप्तराची वेळोवेळी मागणी करूनही न देता त्यांनी ते गहाळ केले. चौकशीदरम्यान संबंधित दप्तर देण्यास नकार दिला. याबाबत तुळशीदास पवार यांच्या कर्जमाफीसंदर्भात शेटे यांनी हे प्रकरण जिल्हा पातळीवरून कोल्हापूरच्या विभागीय पातळीवर नेऊन संबंधित सचिव आणि चेअरमनवर फौजदारी दाखल करण्याची मागणी केली. त्यास अखेर विभागीय सहायक निबंधक सहकारी संस्था, कोल्हापूर विभागाचे राजेंद्रकुमार दराडे यांनी सचिव आणि चेअरमन यांच्याविरुद्ध फौजदारी दाखल करण्याबाबत सहायक निबंधक सातारा यांना आदेश दिले होते. तत्कालीन सचिव आणि चेअरमनवर फौजदारी दाखल करण्याबाबत आदेश देऊनही फौजदारी दाखल करण्यास संबंधित विभागाने दुर्लक्ष केले होते. याबाबत वेळोवेळी पाठपुरावा केल्याने अखेर दहा दिवसांनंतर सोसायटीच्या तत्कालीन सचिव आणि चेअरमनवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हा नोंद करण्यात आला असून, याप्रकरणी अधिक तपास पोलीस हवालदार फरांदे करीत आहेत.
दरम्यान, सातारा तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय नाळे यांनी याप्रकरणी सखोल तपास करण्यात येणार असल्याचे सांगितले. ते म्हणाले, ‘याप्रकरणाच्या तपासात कोणतीही हयगय न करता आरोपीवर कठोर कारवाई करणार आहे. कोणालाही पाठीशी न घालण्याची त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)


कर्जमाफीच्या प्रकरणात घडतंय-बिघडतंय
शेतकरी कर्जमाफी प्रकरणाचा फायदा नेमका कुणाला झाला. याचा शोध कुठल्या ना कुठल्या मार्गाने घेतला जात आहे. ग्रामीण भागांत सोसायट्यामार्फत दिल्या जाणाऱ्या कर्जाची माफी शेतकऱ्यांसाठी जिव्हाळ्याचा विषय ठरली. मात्र, अनेक ठिकाणी कर्जमाफी प्रक्रियेत सावळागोंधळ झाल्याचंच अनेकवेळा उघडकीस आलं आहे. यावर नेहमीच उलट-सुलट बोललं जातं. सहकार विभागानं यातील सत्य लोकांपुढं आणण्याची गरज निर्माण झाली आहे.

Web Title: In the loan forgery case, the Chairman, the Secretariat filed the complaint

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.