कर्ज न घेताही सातबारावर बोजा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2019 12:00 AM2019-11-30T00:00:56+5:302019-11-30T00:01:24+5:30
सातारा : कर्ज न घेताही साताबारा उताऱ्यावर बोजा असल्याचे पाहून एका पोलीस कर्मचाºयाच्या पायाखालची वाळू सरकलीय. चक्क तीन लाखांचे ...
सातारा : कर्ज न घेताही साताबारा उताऱ्यावर बोजा असल्याचे पाहून एका पोलीस कर्मचाºयाच्या पायाखालची वाळू सरकलीय. चक्क तीन लाखांचे थकीत कर्ज दाखविण्यात आले असून, या प्रकारामुळे संबंधित पोलीस कर्मचारी हेलपाटे मारून हतबल झाला आहे. महसूल खात्याच्या अजब कारभाराचा पोलीस कर्मचाºयालाच फटका बसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
पोलीस कर्मचारी संजय माने (वय ५१, रा. तडवळे, (सं) कोरेगाव) हे सध्या पोलीस मुख्यालयात कार्यरत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून ते कुटुंबीयासमवेत साताºयात वास्तव्य करत आहेत. वर्षातून एक दोनवेळा ते गावी जातात. गेल्या काही महिन्यांपूर्वी त्यांनी तलाठ्याकडे जाऊन सातबारा उतारा घेतला. त्यावेळी सातबारा उताºयावरील कर्जाचा बोजा पाहून त्यांच्या पायाखालची वाळू सरकली. तब्बल तीन लाखांचे कर्ज तेही न घेता सातबारा उताºयावर नोंद केली गेली असल्याचे त्यांना दिसून आले. याशिवाय अन्य एका बँकेचाही बोजा त्यांच्या सातबारावर दिसून येत आहे. पंधरा वर्षांपूर्वी त्यांनी शैक्षणिक कर्ज घेतले होते. मात्र, ते कर्ज त्यांनी त्याचवेळी फेडले. असे असतानाही सातबारावर कर्जाचा बोजा असल्याचे पाहून ते अवाक् झाले.
गावच्या सोसायटीमध्ये जाऊन त्यांनी हा प्रकार तेथील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कानावर घातला. त्यावेळी त्यांनी हवालदार संजय माने यांना कसलेही कर्ज थकीत नसल्याचा दाखलाही तत्काळ दिला. हा दाखला घेऊन ते तडवळेमधील तलाठी कार्यालयात गेले. मात्र, या ठिकाणी त्यांना समाधानकारक उत्तर मिळाले नाही. अनेकदा त्यांनी सातबारावरील बोजा कमी करण्यासाठी तलाठी कार्यालयात हेलपाटे मारले; परंतु त्यांची कोणीच दखल घेतली नाही. त्यामुळे त्यांनी कोरेगावच्या तहसीलदारांना भेटण्याचा निर्णय घेतला. वारंवार बंदोबस्ताची ड्यूटी असल्यामुळे त्यांना कोरेगावला जाता आले नाही. त्यांना कोरेगाव येथे बंदोबस्त देण्यात आला होता. यावेळी वेळ काढून ते तहसील कार्यालयात गेले. मात्र, येथेही त्यांना अशीच उत्तरे मिळाली. त्यामुळे त्यांनी आता जिल्हाधिकाºयांकडे न्याय मागितलाय.
तीन लाखांच्या कर्जाचे गूढ कायम...
तडवळे सं. येथील तलाठी ईश्वर नागलोट यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, हवालदार संजय माने यांनी नाहरकत दाखला आमच्याजवळ दिला आहे. बंदोबस्तील बोजा उतरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. १६ दिवसांचा कालावधी असून, येत्या एक-दोन दिवसांत त्यांच्या बंदोबस्तील बोजा कंस करून कमी होईल, असे त्यांनी सांगितले. मात्र, तीन लाखांच्या कर्जाचे गूढ मात्र कायम आहे.