ढोलाच्या तालावर, विळा चाले गवतावर!

By Admin | Published: December 27, 2015 11:39 PM2015-12-27T23:39:04+5:302015-12-28T00:50:09+5:30

आनंददायी कष्ट : कास परिसरातील डोंगर पठारावर पारंपरिक पद्धतीने गवत कापणीला वेग

On the locks of the dhol, the villa walk on the grass! | ढोलाच्या तालावर, विळा चाले गवतावर!

ढोलाच्या तालावर, विळा चाले गवतावर!

googlenewsNext

पेट्री : सातारा शहराच्या पश्चिमेस कास परिसरात ढोलांच्या तालावर पारंपरिक पद्धतीने गवत कापणी करण्यात शेतकरी वर्ग व्यस्त झाला आहे.पावसाळ्यात गुरांना चारा उपलब्ध करता यावा, या हेतूने कास परिसरातील शेतकरी गवत कापणी करू लागले आहेत. हे कष्टाचे काम हसत-खेळत व्हावे, कामात वेग यावा, यासाठी शेतकरी ढोल वाजवत मनोरंजन करत गवतकापणी करत आहेत. हा भाग जंगलाने व्यापलेला आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांचा वावर या भागात जास्त आहे. पाळीव जनावरांसाठीडोंगरपठारावर वाढलेले गवत कापताना वन्यप्राण्यांकडून हल्ले होण्याचा धोका संभवण्याची शक्यता असल्यामुळे शेतकरी वाद्ये वाजवत गवत कापणी करतात. कास परिसरातील कुसुंबीमुरा भागात सध्या गवत कापणीस वेग आला आहे. वाडीवस्तीतील शेतकरी कुटुंबे एकत्र येऊन एकमेकांच्या सहकार्याने ढोल-ताशाच्या गजरात गवत कापणीचे काम करत आहेत, त्यामुळे संपूर्ण परिसरात वाद्याचा आवाज घुमू लागल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
उन्हाळ्यात डोंगरमाथ्यावर चाऱ्याची प्रचंड टंचाई असते. खडकाळ जमिनीमुळे पावसाचे पाणी वाहून जाते. परिणामी पावसाळ्यात उगवलेला चारा जास्त काळ टिकून राहत नाही. यासाठी या भागातील शेतकरी दरवर्षी पठारावर पावसाळ्यात वाढलेले गवत कापत असतात. उन्हाळ्यात याच चाऱ्यावर जनावरांचे पोषण होत असते. काही दिवसांपासून गवत कापण्याचे काम जोमात सुरू आहे. (वार्ताहर)

वनभोजनाचा आनंद न्यारा
कास परिसरात गवत कापणीच्या कामास इर्जिक किंवा कामगत असे बोलले जाते. तसेच गवत कापणीच्या कामात एकमेकांना मदत करणे याला पैरा म्हटले जाते. काही वेळा पैशाच्या मोबदल्यातही कामे करवून घेतली जातात. ज्यांच्याकडे गवत कापणीच्या कामास जायचे आहे, त्यांच्याकडून सर्वांच्या भोजनाची व्यवस्था केली जाते. दुपारी सर्वजण शेताच्या कडेला सावलीला बसून सहभोजनाचा आनंद घेतानाही पाहायला मिळत आहेत.


गवत कापणीचे काम लवकर व्हावे, यासाठी या कामात एकमेकांना सहकार्य केले जाते. शिवारात सर्व मिळून एकत्रित भोजन करतानाचा आनंद तर फारच वेगळा असतो.
- ज्ञानेश्वर आखाडे,
कुसुंबीमुरा

Web Title: On the locks of the dhol, the villa walk on the grass!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.