लोणंद : औषध विक्रेत्यांचा लोणंद शहरातून मोर्चा कडकडीत बंद, ई फार्मसीविरोधात निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2018 01:05 PM2018-09-28T13:05:04+5:302018-09-28T13:06:54+5:30
औषधाची आॅनलाईन विक्री आणि ई -फार्मसीविरोधात देशभरातील औषध विक्रेत्यांनी शुुक्रवारी एक दिवसीय संप पुकारला आहे.
लोणंद : औषधाची आॅनलाईन विक्री आणि ई -फार्मसीविरोधात देशभरातील औषध विक्रेत्यांनी शुुक्रवारी एक दिवसीय संप पुकारला आहे. या बंदमध्ये लोणंदमधील सर्वच औषध विक्रेत्यांनी आपली दुकाने बंद ठेवून ई - फार्मसी विरोधात निषेध नोंदविण्यासाठी लोणंद शहरातून निषेध मोर्चाचे आयोजन केले.
बाजारतळ ते लोणंद नगरपंचायत, गांधी चौक मार्गे हा मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर सर्व औषध विक्रेत्यांनी खंडाळा तहसील कार्यालय येथे जाऊन तहसीलदार विवेक जाधव यांना निवेदन दिले. मोर्चामध्ये लोणंद केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय घोडके, सचिव अजित भोईटे, खजिनदार जितेंद्र गाडे, जावेद पढाण, सारंग जाधव, गणेश देशमुख, रविंद्र शहा, संतोष काकडे, प्रसन्न शहा, विजय ढुमे, वैभव क्षीरसागर, संजय मोकाशी, सत्यजीत खताळ, तुषार बुणगे, सचिन कुंडलकर, नितीन भैरट, शैलजा भोईटे, स्नेहल घोडके, स्मीता शिंदे, सुषमा चोरमले व लोणंद मधील सर्व औषध विक्रेते यामध्ये सहभागी झाले होते.