Lok Sabha Election 2019 राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला युतीच्या टकरा : सतत प्रयत्न करूनही एकदाच यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2019 11:51 PM2019-04-02T23:51:32+5:302019-04-02T23:52:34+5:30

सातारा लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँगे्रस पक्षाचा बालेकिल्ला आहे. हा बालेकिल्ला जिंकून घेण्यासाठी भाजप-शिवसेना-रिपाइं यांच्या महायुतीने सातत्याने टकरा दिल्या

Lok Sabha Election 2019 The alliance collapses with the alliance of the NCP: success with single attempt only after continuous efforts | Lok Sabha Election 2019 राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला युतीच्या टकरा : सतत प्रयत्न करूनही एकदाच यश

Lok Sabha Election 2019 राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला युतीच्या टकरा : सतत प्रयत्न करूनही एकदाच यश

googlenewsNext
ठळक मुद्देयंदा मोठी खलबते झाल्यानंतर नरेंद्र पाटील यांच्या गळ्यात युतीची माळ

सागर गुजर।
सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँगे्रस पक्षाचा बालेकिल्ला आहे. हा बालेकिल्ला जिंकून घेण्यासाठी भाजप-शिवसेना-रिपाइं यांच्या महायुतीने सातत्याने टकरा दिल्या आहेत. यंदाच्या निवडणुकीत तर युती नियोजनबद्धपणे उतरलेली पाहायला मिळते.

भाजप-शिवसेना युतीने काहीही करून सातारा लोकसभा मतदारसंघ आपल्याकडे घेण्यासाठी प्रयत्न केले. गेल्या दोन निवडणुकांत खासदार उदयनराजे भोसले हे या मतदार संघात मोठ्या फरकाने निवडून येत आहेत, तसेच त्यांच्या वलयाचा फायदा उठवून महाराष्ट्रभर युतीचा दिंडोरा पिटण्याचा भाजप-शिवसेना युतीच्या नेत्यांचा मानस होता. उदयनराजे हाताला लागतायत का? यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मधल्या काळात चांगलीच साखरपेरणी केली होती.

‘राजेंनी काही मागण्याआधीच आम्ही देणार,’ असं सांगत त्यांनी उदयनराजेंचं मन वळविण्याचा प्रयत्न केला. सातत्याने सातारा जिल्ह्यातील विविध कार्यक्रमांना त्यांनी हजेरीही लावली होती; परंतु तेल लावलेल्या पैलवानाप्रमाणे उदयनराजे युतीच्या हाती लागले नाहीत.
राष्ट्रवादीची उमेदवारी घेऊन भाजप सरकारवर आसूड ओढणाऱ्या उदयनराजेंविरोधात उमेदवार देताना युतीने मोठा विचारविनिमय केला. उदयनराजेंविरोधात माथाडी नेते नरेंद्र पाटील यांना युतीने शिवसेनेतर्फे उमेदवारी दिली आहे. यंदाची निवडणूक युती मागच्याप्रमाणे ‘लाईटली’ घेणार नाही, हेच आता स्पष्टपणे दिसते. २00९ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी-काँगे्रसने ६५.२२ टक्के मते घेतली होती. २0१४ च्या निवडणुकीत ५३.५0 टक्के मिळवली होती.

उदयनराजे - नरेंद्र यांच्यात टक्कर  राष्ट्रवादीचा भक्कम किल्ला

२00९ मध्ये उदयनराजेंनी दबावतंत्र वापरून राष्ट्रवादीची उमेदवारी मिळवली होती. सलग दोन निवडणुकांत ते विजयी ठरले.
गेल्या दोन निवडणुकांत राष्ट्रवादीचे उमेदवार खा. उदयनराजे भोसले यांनी विक्रमी मतांनी विजय मिळवला आहे.
यंदा शिवसेनेचे नरेंद्र पाटील यांचे मोठे आव्हान उदयनराजे भोसले यांच्यापुढे आहे. राष्ट्रवादी-काँगे्रस विरोधात भाजप-शिवसेना अशीच ही लढत ठरणार आहे.

 

Web Title: Lok Sabha Election 2019 The alliance collapses with the alliance of the NCP: success with single attempt only after continuous efforts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.