Lok Sabha Election 2019 बेरजेच्या राजकारणात काँग्रेस मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2019 10:44 PM2019-04-03T22:44:31+5:302019-04-03T22:45:27+5:30

दशरथ ननावरे । लोकमत न्यूज नेटवर्क खंडाळा : लोकसभा निवडणुकीच्या रणांगणात विधानसभेची चाचपणी सुरू झाली आहे. विविध पक्षांच्या बड्या ...

Lok Sabha Election 2019 Congress back in peer politics | Lok Sabha Election 2019 बेरजेच्या राजकारणात काँग्रेस मागे

Lok Sabha Election 2019 बेरजेच्या राजकारणात काँग्रेस मागे

Next

दशरथ ननावरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
खंडाळा : लोकसभा निवडणुकीच्या रणांगणात विधानसभेची चाचपणी सुरू झाली आहे. विविध पक्षांच्या बड्या नेत्यांची उड्डाणे सुरू असताना विधानसभेच्या प्रत्येक मतदार संघातही याचे पडसाद उमटू लागले आहेत. वाई विधानसभेच्या पटलांवरही ही स्थित्यंतरे दिसून येत आहेत. भाजपा, राष्ट्रवादी या प्रमुख पक्षांनी बेरजेचे राजकारण सुरू करीत बळ वाढविण्याच्या हालचाली चालविल्या आहेत. बेरजेच्या राजकारणात काँग्रेसची वजाबाकी होताना दिसते.
लोकसभेच्या प्रार्श्वभूमीवर राजकीय पटलावर अनेक घडामोडी घडल्या आहेत. दोनच महिन्यांपूर्वी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाची सूत्रे हाती घेऊन सेनापती बनलेल्या फलटणच्या रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी भाजपाच्या वाहत्या गंगेत झेप घेतली. त्यामुळे इतर पदाधिकाऱ्यांच्या हाताला आधार उरला नसल्याची भावना सर्वसामान्य कार्यकर्त्यांची आहे. वाई मतदार संघात विधानसभेचे लक्ष्य ठेवून माजी आमदार मदन भोसले यांनी भाजपात प्रवेश केल्याने राष्ट्रीय कॉँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते हवालदिल झाल्याने पक्षाचे भवितव्य धोक्यात आले असल्याची चर्चा आहे. त्यातच वाई खंडाळ्यातील दादा गटाच्या कार्यकर्त्यांनी गावोगावी भाजपाचा मंत्रोच्चार सुरू केला आहे. त्यामुळे काँग्रेसच्या किल्ल्याचे बुरुज ढासळू लागले आहेत.
वाई तालुक्यातील भुर्इंज गटातून काँग्रेसकडून जिल्हा परिषद लढलेले प्रकाश दुरगुडे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह आमदार मकरंद पाटील यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून राष्ट्रवादीत प्रवेश करून कार्यकर्त्यांना वाट मोकळी करून दिली. खंडाळा तालुक्यातील काँग्रेसची अवस्था यापेक्षा वेगळी नाही. वास्तविक जिल्हा परिषद निवडणुकांपासूनच काँग्रेसने मैदान सोडल्याने अनेकांनी राष्ट्रवादीचा आश्रय घेतला. त्यानंतर आमदार मकरंद पाटील यांच्या संपर्कात असलेले सगळेच काँग्रेसजण राष्ट्रवादीकडे वळले.
मध्यंतरी भादे गटातील एका गावात झालेल्या राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात तर कॉँग्रेससह इतर पक्षातील नेत्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करून आता कॉँग्रेसला वाली उरला नसल्याचाच संदेश दिला. या कार्यक्रमातून मकरंद पाटील यांनी आपले स्थान मजबूत असल्याचे स्पष्ट करीत राष्ट्रवादीच्या नाराजांनाही चांगलीच चपराक दिली.
वाई मतदार संघात विधानसभा डोळ्यासमोर ठेवून आबा, दादांनी जनसंपर्क वाढवून लोकसभेच्या मैदानातच पेरणी सुरू केली. एकीकडे राष्ट्रवादी आणि भाजपाने इनकमिंगची दारे उघडी ठेवून बेरीज साधली आहे; मात्र दुसरीकडे काँग्रेसला आऊटगोर्इंग रोखता न आल्याने पक्षाची वजाबाकी सुरू आहे.

Web Title: Lok Sabha Election 2019 Congress back in peer politics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.