Lok Sabha Election 2019 सातारा, माढा मतदार संघात पंतप्रधानांसह शरद पवार, मुख्यमंत्री, उद्धव अन् राज ठाकरेंचीही सभा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2019 12:07 PM2019-04-10T12:07:54+5:302019-04-10T12:20:13+5:30

सातारा आणि माढा लोकसभा मतदार संघातील उमेदवारांना चिन्ह वाटप झाले असून, आता खºया अर्थाने प्रचाराच्या तोफा धडाडणार आहेत.

Lok Sabha Election 2019 Dhan Dhadka of the propagated guns in Satara, Madha Voter Sanghatana, meeting with Sharad Pawar, Chief Minister, Uddhav and Raj Thackeray | Lok Sabha Election 2019 सातारा, माढा मतदार संघात पंतप्रधानांसह शरद पवार, मुख्यमंत्री, उद्धव अन् राज ठाकरेंचीही सभा 

Lok Sabha Election 2019 सातारा, माढा मतदार संघात पंतप्रधानांसह शरद पवार, मुख्यमंत्री, उद्धव अन् राज ठाकरेंचीही सभा 

Next
ठळक मुद्दे चिन्ह वाटपानंतर वेग

सातारा : सातारा आणि माढा लोकसभा मतदार संघातील उमेदवारांना चिन्ह वाटप झाले असून, आता खºया अर्थाने प्रचाराच्या तोफा धडाडणार आहेत. त्याचबरोबर येथील उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मुख्यमंत्री, उद्धव ठाकरे, राज ठाकरे व इतर राजकीय पदाधिकारी, मंत्र्यांच्या सभा या दोन्ही मतदार संघांत होणार आहेत. 

सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदार संघांपैकी दोन मतदार संघांचा माढ्यात समावेश आहे. तर इतर सहा विधानसभा मतदासंघ साताºयाला जोडले आहेत. या दोन्हीही लोकसभा मतदार संघातील निवडणूक चुरशीची होत आहे. त्यामुळे एक-एक मतही सर्वच उमेदवारांसाठी महत्त्वपूर्ण ठरणारे आहे. साताºयात राष्ट्रवादीचे उमेदवार उदयनराजे भोसले आणि शिवसेनेचे नरेंद्र पाटील यांच्यात प्रमुख लढत होत आहे. तर वंचित बहुजन आघाडी, बळीराजा शेतकरी संघटना, बसपा, बहुजन सोशालिस्ट पार्टी व अपक्ष असे एकूण ९ उमेदवार रिंगणात आहेत. तर माढ्यातून तब्बल ३१ उमेदवार मैदानात आहेत. माढ्यातील निवडणूक राष्ट्रवादीचे संजय शिंदे आणि भाजपचे रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्यातच प्रामुख्याने होत आहे. वंचित बहुजन आघाडीचे विजयराव मोरे यांच्यासह इतर पक्षांचे व अपक्ष उमेदवारही रिंगणात आहेत. 

दोन्हीही मतदार संघांतील उमेदवारांना सोमवारी निवडणूक चिन्ह वाटप करण्यात आले. त्यामुळे खºयाअर्थाने प्रचार यंत्रणा आणखी गतिमान झालीय. उमेदवार त्यांचे कार्यकर्ते आपले चिन्ह मतदारांपर्यंत कसे पोहोचेल, यासाठी मोहीम तीव्र करीत आहेत. त्याचबरोबर विविध पक्षाच्या वतीने सभांचे आयोजन करण्यात आले आहे. 

उमेदवाराला चिन्ह वाटप झाल्यानंतर पहिलीच सभा होत आहे ती माढा मतदार संघात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दि. १० रोजी दोन या ठिकाणी सभा घेणार आहेत. सातारा जिल्ह्यात फलटण येथे तसेच पंढरपूर तालुक्यातील वाडी कुरोली येथे या सभा होणार आहेत. शिवसेनेचे आदित्य ठाकरे हे १२ रोजी कोरेगाव येथे प्रचार सभा घेणार आहेत. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी माढ्यातील भाजप उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्यासाठी दि. १७ ला अकलूज (ता. माळशिरस) येथे सभा घेणार आहेत. तसेच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हेही सातारा मतदार संघातील राष्ट्रवादीचे उमेदवार उदयनराजे भोसले 

यांच्यासाठी स्वतंत्रपणे कराड  येथे सभा घेणार आहेत. 

सातारा जिल्हा परिषदेच्या मैदानावर दि. २० ला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सभेचे नियोजन करण्यात येत आहे. तर २१ रोजी याच मैदानावर महायुतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांच्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे सभा घेणार आहेत. 

वंचित बहुजन आघाडीचे साताºयातील उमेदवार एस. के. ऐवळे यांच्यासाठी भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची सभा होणार आहे. कºहाडमध्ये या सभेचे नियोजन करण्यात येत असले तरी तारीख अंतिम झालेली नाही. 

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सातारा आणि माढा मतदारसंघात विविध राजकीय पक्षांकडून नेत्यांच्या सभांची तारीख अंतिम करणे व इतर बाबींसाठीची पूर्तता सुरूच आहे. तरीही या नेत्यांच्या सभांनी राजकीय वातावरण आणखी ढवळून निघणार आहे. आरोप, प्रत्यारोपांच्या फैरी झडणार असून  याकडे राजकीय नेत्यांबरोबरच मतदारांचेही लक्ष लागून राहिल्याचे दिसून येत आहे. 

 

Web Title: Lok Sabha Election 2019 Dhan Dhadka of the propagated guns in Satara, Madha Voter Sanghatana, meeting with Sharad Pawar, Chief Minister, Uddhav and Raj Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.