Lok Sabha Election 2019 खटाव, माण तालुक्यातील ३८ मतदानकेंद्राचे होणार थेट प्रेक्षपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 12:22 PM2019-04-11T12:22:18+5:302019-04-11T12:22:46+5:30
लोकसभा निवडणुकीच्या तिसºया टप्पात होत असलेल्या निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झाले आहे. खटाव, माण तालुक्यातील ३८ मतदान केंद्रे अतिसवेदनशील म्हणून घोषीत
मायणी : लोकसभा निवडणुकीच्या तिसºया टप्पात होत असलेल्या निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झाले आहे. खटाव, माण तालुक्यातील ३८ मतदान केंद्रे अतिसवेदनशील म्हणून घोषीत करण्यात आली. या सर्व मतदानकेंद्रांमध्ये निवडणुक आयोगाकडून थेट प्रेक्षपण करण्यात येणार आहे’ अशी माहिती प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी दिली.
याबाबत माहिती लोकसभा निवडणुकीमध्ये माढा मतदार संघातील मतदान दुसºया टप्पात आहे. या तिसºया टप्पामध्ये सातारा जिल्ह्यातील माण विधानसभा मतदार संघातील ३८ मतदान केंद्र निवडणुक आयोगाने अतिसवेदनशिल म्हणुन घोषीत केली आहेत .
यामध्ये खटाव तालुक्यातील मायणीतील २९९ व ३०० यासह आठ, वडुजमधील बारा तर माण तालुक्यातील दहीवडीतील आठ म्हसवडमधील नऊ व पांढरवाडीतील एक अशा ३८ मतदान केंद्राचा समावेश आहे. या सर्व मतदान केंद्र्रामध्ये सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहेत. याचे निवडनुक आयोगाकडे थेट प्रेक्षपण होणार आहे.
याबाबत कोठे सीसीटीव्ही बसवायचे याचे लोकेशन, निवडणूक पार्श्वभूमीवर लागणाºया सर्व प्राथमिक सोयीसुविधांकडे गांभिर्याने पाहून प्रशासनाकडून संपुर्ण तयारी पुर्ण केली असल्याची प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी दिली. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल वडनेरे, गोपनीय विभागाचे शरद गुरव, तलाठी शंकर चाटे, पोलीस पाटील प्रशांत कोळी व सचिन शेठे उपस्थित होते.