Lok Sabha Election 2019 साडेतीन लाखांच्या मताधिक्याचा रेकॉर्ड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 11:16 PM2019-04-16T23:16:25+5:302019-04-16T23:16:46+5:30
सातारा : सातारा लोकसभा मतदार संघाचे अनेक दिग्गज नेत्यांनी प्रतिनिधित्व केले. त्यामध्ये प्रतिसरकारमधील क्रांतिसिंह नाना पाटील, किसन वीर, महाराष्ट्राचे ...
सातारा : सातारा लोकसभा मतदार संघाचे अनेक दिग्गज नेत्यांनी प्रतिनिधित्व केले. त्यामध्ये प्रतिसरकारमधील क्रांतिसिंह नाना पाटील, किसन वीर, महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण, प्रतापराव भोसले यांनी राज्याचे नेतृत्व केले. या मतदार संघावर सन १९५७ मध्ये कम्युनिस्ट पार्टी व १९९६ मध्ये शिवसेना असा अपवाद वगळल्यास काँग्रेस आणि त्यानंतर राष्ट्रवादीचे वर्चस्व राहिले आहे. सन १९७७ मध्ये यशवंतराव चव्हाणांनी भारतीय लोकशाही दलाच्या नितीन लावंघरे यांचा १ लाख ९९ हजार ६०१ मतांनी पराभव केला. हा विक्रम सन १९८९ मध्ये प्रतापराव भोसलेंनी तर २०१४ मध्ये उदयनराजेंनी नवीन विक्रम केला.
कोणाला किती होते मताधिक्य
वर्ष नाव मताधिक्य
1951 गणेश आळतेकर 37,224
1957 नाना पाटील 68,449
1962 किसन वीर 1,03,691
1967 यशवंतराव चव्हाण 1,27,836
1971 यशवंतराव चव्हाण 1,76,830
1977 यशवंतराव चव्हाण 1,91,601
1980 यशवंतराव चव्हाण 53,033
1984 प्रतापराव भोसले 95,520
1989 प्रतापराव भोसले 3,16,991
1991 प्रतापराव भोसले 1,59,212
1996 हिंदुराव नाईक-निंबाळकर 11,809
1998 अभयसिंहराजे भोसले 1,81,476
1999 लक्ष्मणराव पाटील 1,24,771
2004 लक्ष्मणराव पाटील 3,957
2009 उदयनराजे भोसले 2,97,515
2014 उदयनराजे भोसले 3,66,594
3,66,594
एवढ्या मताधिक्याने उदयनराजे भोसले यांना २०१४ मध्ये विजय मिळाला होता. त्यावेळी त्यांना ५,२२,१५३ मते मिळाली होती. त्यांच्या विरोधात शिवसेनेचे बंडखोर व अपक्ष पुरुषोत्तम जाधव उभे होते. त्यांना १,५५,९३७ मते मिळाली होती. त्यावेळी त्यांचा ३ लाख ६६ हजार ५९४ मताधिक्याने पराभव झाला होता. हा रेकॉर्ड अबाधित आहे.