फलटण, वाईमध्ये आज ‘लोकमत रक्तदान शिबिर’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:26 AM2021-07-04T04:26:27+5:302021-07-04T04:26:27+5:30
फलटण/वाई : ‘लोकमत’चे संस्थापक संपादक दिवंगत जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. या अनुषंगाने रविवार, ...
फलटण/वाई : ‘लोकमत’चे संस्थापक संपादक दिवंगत जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. या अनुषंगाने रविवार, दि. ४ सकाळी नऊ वाजता फलटण येथील महाराजा मंगल कार्यालय, तर वाईमधील त.ल. जोशी विद्यालय हॉल येथे सकाळी दहा ते सायंकाळी चार या वेळेत हे रक्तदान शिबिर होणार आहे. यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
कोरोनाकाळात राज्यात रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’तर्फे महाराष्ट्रात रक्तदान शिबिर आयोजित केले जात आहेत. या शिबिरात स्वराज फाउंडेशन फलटण, क्रांतिसूर्य प्रतिष्ठान व मायभूमी फाउंडेशन फलटण, अहद सामाजिक विकास संस्था फलटण, सद्गुरू प्रतिष्ठान फलटण, आयुर उद्योगसमूह फलटण, के.बी. एक्स्पोर्ट फलटण, आर्ट ऑफ लिव्हिंग फलटण, आमिरभाई शेख मित्रमंडळ फलटण, क्षत्रिय माळी युवक संघ फलटण हे सहभागी होणार आहेत. शिबिराचे उद्घाटन प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप, तहसीलदार समीर यादव, उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे, नगराध्यक्षा नीताताई नेवसे, बाजार समितीचे संचालक शंकरराव सोनवलकर, सहायक निबंधक सुनील धायगुडे यांच्या उपस्थितीत होणार आहे.
वाई येथे रविवारी सकाळी दहा ते सायंकाळी चार या वेळेत त. ल. जोशी विद्यालय हॉल येथे शिबिर होणार आहे. यामध्ये यशवंत शिक्षण संस्था, आम्ही रक्तदाते महाराष्ट्रचे, रोटरी क्लब, माध्यमिक शिक्षक संघ, प्राथमिक शिक्षक समिती, प्राथमिक शिक्षक संघ, सर्वोदय सेवा संस्था, अर्पण ग्रुप, जयहिंद फाउंडेशन, शिवसह्याद्री ॲकॅडमी, अखिल भारतीय ग्राहक पंचायत, भगवा कट्टा प्रतिष्ठान, फ्रेशकोज ॲग्री प्रोसेसिंग कंपनी, पतंजली योग समिती, वाई यंगस्टार्स, सुयश प्रतिष्ठान यांच्यासह सामाजिक संस्था सहभागी झाल्या आहे. फलटण आणि वाई येथील रक्तदान शिबिरात सहभागी होऊन सामाजिक योगदान द्यावे, असे आवाहन केले आहे.