लोणंद नगर पंचायत निवडणूक : चार प्रभागात १९ उमेदवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2022 04:27 PM2022-01-11T16:27:20+5:302022-01-11T16:27:39+5:30
निवडणूक १८ जानेवारीला होत असून, मतमोजणी १९ जानेवारी रोजी होणार आहे.
लोणंद : लोणंद नगर पंचायत निवडणुकीमध्ये उर्वरित चार प्रभागांच्या निवडणुकीसाठी सोमवार, १० रोजी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस होता. शेवटच्या दिवशी पाच उमेदवारांनी अर्ज माघारी घेतल्याने चार प्रभागात १९ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
प्रभाग क्रमांक एक हा सर्वसाधारण महिलेसाठी असून, या प्रभागात भारतीय जनता पार्टीच्यावतीने दीपाली संदीप शेळके, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्यावतीने प्रतिभा राहूल शेळके, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने वर्षा हनुमंत शेळके, तर शिवसेनेच्यावतीने अनिता बाबूराव माचवे या आहेत.
प्रभाग दोन सर्वसाधारण महिलेसाठी असून, आसिया साजिद बागवान राष्ट्रीय काँग्रेस, निर्मला दादासाहेब शेळके राष्ट्रवादी काँग्रेस, राधिका संजय जाधव शिवसेना आणि संगीता किशोर भारतीय जनता पार्टी तर अपक्ष म्हणून मनिषा चंद्रकांत शेळके उभ्या आहेत.
प्रभाग क्रमांक अकरा सर्वसाधारण आहे. विश्वास सदाशिव शिरतोडे शिवसेना, उत्तम श्यामराव कुचेकर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, भरती जयवंत बोडरे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, श्रीकुमार सुरेश जावळे भारतीय जनता पार्टी, अपक्ष म्हणून भंडलकर, शरद वसंतराव आहेत.
प्रभाग सोळा सर्वसाधारण जागेसाठी असून, या प्रभागात गणेश शंकर पवार शिवसेना, प्रवीण बबनराव व्हावळ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, विनया दत्तात्रय कचरे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, प्रदीप नामदेव क्षीरसागर भारतीय जनता पार्टी, जाविद शमशुद्दीन पटेल हे अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात आहेत. ११ जानेवारी रोजी चिन्ह वाटप करण्यात येणार आहे.
या चारही प्रभागात तुल्यबळ लढती असून, प्रभाग २, ११ व १६ मध्ये अपक्ष उमेदवार निर्णायक ठरणार आहेत. चारही प्रभागात काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना व भाजपा अशी चौरंगी लढत पहावयास मिळणार आहे. २१ डिसेंबर रोजी तेरा प्रभागांची निवडणूक पार पडली. उर्वरित चार प्रभागांची निवडणूक १८ जानेवारीला होत असून, मतमोजणी १९ जानेवारी रोजी होणार आहे.