नगराध्यक्षपदाचा आज लोणंदला होणार फैसला : राष्टवादीचे पारडे जड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2018 11:15 PM2018-10-25T23:15:47+5:302018-10-25T23:17:25+5:30
लोणंद : लोणंद नगरपंचायतीच्या आज होणाऱ्या निवडीकडे संपूर्ण तालुक्याच्या नजरा वळाल्या आहेत. संपूर्ण गावात गेल्या आठवडाभरात सुरू असलेल्या उलट-सुलट ...
लोणंद : लोणंद नगरपंचायतीच्या आज होणाऱ्या निवडीकडे संपूर्ण तालुक्याच्या नजरा वळाल्या आहेत. संपूर्ण गावात गेल्या आठवडाभरात सुरू असलेल्या उलट-सुलट चर्चांना आज दि. २६ रोजी दुपारी बारा वाजता पूर्णविराम मिळणार आहे. तसेच नगराध्यक्षपद घोषित केल्यानंतर लगेचच उपनगराध्यक्ष पदासाठी निवडणूक घेण्यात येणार आहे.
लोणंदच्या नगराध्यक्षपदाची धुरा आपल्याच पक्षाकडे राहावी, यासाठी आमदार मकरंद पाटील व अॅड. बाळासाहेब बागवान यांच्यामध्ये चुरस निर्माण झाली आहे. गेल्या आठवडाभर लोणंदचा भावी नगराध्यक्ष कोण? यावर चौकाचौकात चर्चा रंगविल्या जात होत्या. लोणंद नगरपंचायतीची सूत्रे आपल्याच हातात राहावीत. यासाठी मकरंद पाटील यांनी भाजपाला सोबत घेतले असून, त्यांना उपनगराध्यक्ष पद देण्याचे कबूल केले आहे. तर अपक्ष म्हणून निवडून आलेले सचिन शेळके यांना नगराध्यक्ष पदाची संधी देऊन त्यांना राष्टÑवादीत सामावून घेतले आहे. तर काँग्रेसचाही एक नगरसेवक राष्टÑवादीच्या बाजूने येणार असल्याचे बोलले जात आहे. या निवडणुकीत आमदार मकरंद पाटीलच लोणंद नगरपंचायतीवर आपले वर्चस्व प्रस्थापित करणार असल्याची जोरदार चर्चा केली जात आहे.
मात्र, प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी फार मोठी उलथापालथ होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. अॅड. बाळासाहेब बागवान व आनंदराव शेळके-पाटील आपल्या गावाच्या चाव्या आमदारांच्या हातात सहजासहजी देणार नाहीत. काँग्रेस पक्ष आपल्याकडे सत्ता यावी, यासाठी राष्टवादी पक्षाचे काही नाराज नगरसेवक व भाजपालाही जवळ करण्याचे प्रयत्न करीत असल्याची चर्चा नागरिकांंमध्ये चालू आहे. पैशाचा दुरुपयोग करून लोणंदचे राजकारण गढूळ करणाºया व अनुभव नसलेले नगरसेवक फोडणाºयांच्या हातात कोणत्याही परिस्थितीत सत्ता जाऊ देणार नाही, यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करीत असल्याची चर्चा काँग्रेसच्या वर्तुळात सुुरू आहे.
नगराध्यक्षपद कोणाकडे जाणार, याची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. याचे उत्तर मिळण्यासाठी नागरिकांना आजच्या दुपारपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.दि. २६ रोजी सकाळी दहा ते बारापर्यंत उपनगराध्य पदासाठी नामनिर्देशन पत्र मुख्याधिकारी यांच्याकडे सादर करण्यात येणार आहे. नगराध्यक्ष पदाच्या निवडीनंतर लगेचच उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक घेण्यात येणार आहे.
संपूर्ण लोणंदकरांचे लक्ष
पंचायत समिती निवडणुकीमध्ये आमदार मकरंद पाटील यांनी जातीय राजकारण केले, असा आरोप धनगर समाजातील काही नेत्यांनी आमदारांवर केला होता. त्याची परतफेड करण्यासाठी यावेळी आमदारांनी सचिन शेळके यांना नगराध्यक्षपदाची संधी दिली आहे. सचिन शेळके यांनी मागील अडीच वर्षांत आनंदराव शेळके-पाटील यांनाच मदत केली होती. मात्र, यावेळी सचिन शेळके यांना आनंदराव शेळके-पाटील मदत करणार का? याकडे संपूर्ण लोणंदकरांचे लक्ष लागून राहिले आहे.दरम्यान, उद्या निवडणुकीच्या दरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी नगरपंचायतीच्या आवारात भला मोठा पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार असल्याची माहिती एपीआय गिरीश दिघावकर यांनी दिली.