लोणंदच्या एव्हरेस्टवीर प्राजित परदेशी यांची समुद्रात तिरंगा सलामी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 09:05 AM2021-02-05T09:05:44+5:302021-02-05T09:05:44+5:30

लोणंद : प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने शासकीय, निमशासकीय कार्यालये, शाळा-महाविद्यालयांतून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली जाते. लोणंदमधील एव्हरेस्टवीर प्राजित परदेशी यांनी यानिमित्ताने ...

Lonand's Everest hero Prajit Pardeshi's tricolor salute at sea! | लोणंदच्या एव्हरेस्टवीर प्राजित परदेशी यांची समुद्रात तिरंगा सलामी!

लोणंदच्या एव्हरेस्टवीर प्राजित परदेशी यांची समुद्रात तिरंगा सलामी!

googlenewsNext

लोणंद : प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने शासकीय, निमशासकीय कार्यालये, शाळा-महाविद्यालयांतून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली जाते. लोणंदमधील एव्हरेस्टवीर प्राजित परदेशी यांनी यानिमित्ताने अनोख्या पद्धतीने मालवण येथील दांडी बीचच्या समुद्रात तिरंगा सलामी दिली. सिंधुदुर्ग किल्ल्याच्या जवळ समुद्रात मध्यभागी जाऊन तीन बोटींच्या मदतीने अंदाजे चारशे फूट लांब निसर्गपूरक खाण्याचे रंग व मत्स्य खाद्याचा वापर करून तिरंगा साकारला.

लोणंदचे सुपुत्र एव्हरेस्टवीर व अनेक रेकॉर्ड पादाक्रांत केलेले प्राजित परदेशी यांनी २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्ताने शनिवारी मालवणच्या दांडी बीचच्या समुद्रात सिंधुदुर्ग किल्ल्याजवळ समुद्राच्या मध्यभागी जाऊन तीन बोटींच्या मदतीने अंदाजे ४०० फूट लांब निसर्गपूरक खाण्याचे कलर व मत्स्य खाद्य वापरून भारताचा तिरंगा बनवून अनोखी सलामी दिली. प्राजित परदेशी व त्यांच्या सहकाऱ्यांनी १५ ऑगस्ट २०१९ रोजी ३२१ फुटांची भव्य तिरंगा रॅली लोणंदमध्ये काढली होती. मागील वर्षी सिंहगडावर साडेतीनशे फूट भगवी रॅली काढून तानाजी मालुसरे यांना आदरांजली वाहण्यात आली होती, तर तीन महिन्यांपूर्वी कळसुबाई शिखरावर तिरंगा ध्वजाच्या माध्यमातून महाराष्ट्राचा नकाशा काढण्यात आला होता.

मागील महिन्यात मालवण समुद्रामध्ये ३२१ फूट तिरंगा फडकविला होता.

प्राजित परदेशी यांची संकल्पना पूर्णत्वास नेण्यासाठी ॲडव्हेंचर फोटोग्राफर मेहुल ढवळे, वनरक्षक विश्वास मिसाळ, राहुल परदेशी व मालवण येथील अन्वय अंडरवॉटर सर्व्हिसेसचे रूपेश प्रभू, अन्वय प्रभू, सुमंत लोणे, राजू परब, राशमीन रोगे, नारायण रोगे यांचे सहकार्य लाभले.

त्यांनी तीन बोटींद्वारे सुमारे तीन किलोमीटर आत समुद्रामध्ये गेल्यानंतर मालवण येथील दांडी बीच समुद्रामध्ये सुमारे चारशे फूट लांब तिरंगा निसर्गपूरक खाण्याचे रंग व मत्स्य खाद्य वापरून भारताचा तिरंगा साकारला. भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त एक आगळीवेगळी सलामी दिली. ज्या पद्धतीने वायुसेनेचे जवान हवेत विमानाच्या मदतीने धूर सोडून हवेत तिरंगा निर्माण करून सलामी देतात, त्याच पद्धतीची सलामी या अवलियांनी समुद्रातील पाण्यामध्ये दिली.

कोणत्याही देशाचा चारशे फूट लांब एवढा मोठा तिरंगा पाण्यामध्ये तयार करण्याची बहुदा पहिलीच वेळ असावी.

चौकट

‘वंदे मातरम्’च्या घोषणा

लोणंद येथील प्राजित परदेशी यांनी समुद्रात साकारलेला तिरंगा पाहून इतर पर्यटकांनी यावेळी ‘वंदे मातरम्’, ‘भारत माता की जय’च्या घोषणा दिल्या. अनेकांनी हा क्षण मोबाइलमध्ये कैद केला.

फोटो

२५लोणंद-तिरंगा

लोणंद येथील एव्हरेस्टवीर प्राजित परदेशी यांनी शनिवारी मालवणच्या समुद्रात निसर्गपूरक रंग व मत्स खाद्य सोडून तिरंगा साकारून सलामी दिली. (छाया : संतोष खरात)

Web Title: Lonand's Everest hero Prajit Pardeshi's tricolor salute at sea!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.