‘लुडो’मुळे तरुणाई विसरली तहान-भूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2018 12:55 AM2018-11-26T00:55:16+5:302018-11-26T00:55:21+5:30

स्वप्निल शिंदे । लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : लहान मुलांसह तरुणांना स्मार्टफोनमध्ये असलेल्या ‘लुडो’ या गेमचे खूळ सध्या शहरात ...

Loodo forgets thirst for hunger | ‘लुडो’मुळे तरुणाई विसरली तहान-भूक

‘लुडो’मुळे तरुणाई विसरली तहान-भूक

googlenewsNext

स्वप्निल शिंदे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : लहान मुलांसह तरुणांना स्मार्टफोनमध्ये असलेल्या ‘लुडो’ या गेमचे खूळ सध्या शहरात तसेच ग्रामीण भागात वाऱ्यासारखे पसरले आहे. जवळजवळ प्रत्येकाच्या फोनमध्ये ही गेम पाहायला मिळत असून, त्याने अक्षरश: तहान-भूक विसरायला लावली आहे.
सातारासारख्या शहरात सध्या टपरीवर, कट्ट्यांवर, बसस्टॉप, दुकाने, उद्यान अशा सार्वजनिक ठिकाणी चार तरुण टाळकी एकत्र येऊन मोबाईलमध्ये डोके घालून काहीतरी करीत असतात. हे तरुण-तरुणी काही आक्षेपार्ह गोष्टी करीत नसून स्मार्टफोनवर त्यांचा लुडोचा डाव रंगलेला असतो.
एका क्लिकवर कवड्या टाकून आणि सोंगट्या फिरवून ही तरुण पोरं तासन्तास लुडोचा आनंद घेत आहेत. केवळ तरुणच नव्हे, तर आजी, आजोबा आणि नातवंडे यांच्यातही लुडोचा डाव चांगलाच रंगू लागला आहे. एका वेळी जास्तीत जास्त सहाजण या गेमचा आनंद घेऊ शकतात. थोडा मोकळा वेळ मिळाला, की लगेच गेम सुरू होतो आणि मग तासन्तास भान हरपून खेळणाºयांची डोकी मोबाईलभोवती रिंगण करतात. चहाची टपरी असो की कॉलेजचे पार्किंग, मैदान असो की क्लासची बिल्डिंग सगळ्याच ठिकाणी लुडोच्या वेडाने जमलेली डोक्याची ही रिंगणं सध्या सगळ्यांच्याच चर्चेचा विषय ठरत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून खरे तर लहान मुलांच्या खेळांच्या प्रकारांमध्ये लुडोचे स्थान आहे; पण तरुणांनाही त्याची क्रेझ आहे. सापशिडीच्या मागच्या बाजूला लुडोचा पट असायचा.सापशिडीच्याच सोंगट्या वापरून तो गेम खेळता येत होता; पण सध्या या खेळाने तरुणाईला वेड लावले आहे.
पोकेमॉननेही लावले वेड
स्मार्टफोनवर अल्पावधीत ठरला लोकप्रिय पोकेमॉन या खेळाने तरुणाईला असेच वेड लावले होते. दोन-तीन महिने हा गेम हिटलिस्टवर होता. तहान-भूक विसरून तरुण पोकेमॉनच्या शोधात वणवण भटकत होते. लुडो हा गेम भटकण्याचा नसला तरी त्याने तरुणांना तहान भूक विसरायला लावली आहे. स्मार्टफोनवरचा गेम अल्पावधीतच लोकप्रिय ठरला आहे.
गेमवर पैशांचा जुगार लावण्याच्या घटना
मोबाईल गेम सध्या लोकं मनोरंजनासाठी किंवा टाईमपाससाठी राहिलेले नसून ते जुगाराचा अड्डा होत आहे. जुगारासाठी पत्ते, पूल आदी खेळांचा प्रयोग अनेक वर्षांपासून सुरू आहे; पण आता या यादीत लुडो मोबाईल गेमही सामील झाला आहे. गेमचा चुकीचा फायदा काही लोक घेऊन अवैध काम करत आहेत. काही लोकांनी या गेमवर पैशांचा जुगार लावणे सुरू केले आहे. हिंगोलीमध्ये सातजणांना पोलिसांनी अटक केली.

Web Title: Loodo forgets thirst for hunger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.