चाकातली हवा गेल्याचे सांगत लुटमारीचा फंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2017 12:00 AM2017-09-20T00:00:09+5:302017-09-20T00:00:09+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : ‘ओ.... काच खाली घ्या... टायरमधली हवा बघा कमी झालीये... गाडी थांबवा आधी, नाहीतर जोरात अपघात होईल...!’ असे सांगून राष्ट्रीय महामार्गावर सुसाट वेगाने जाणाºया चारचाकीला अडवून लुटण्याच्या घटना घडू लागल्या आहेत. या घटनेची माहिती देणारी आणि टोळीपासून सावध होण्यासाठी आवश्यक काळजी घेण्याची आॅडियो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
याविषयी अधिक माहिती अशी, गत सप्ताहात पुण्याहून साताºयाकडे कुटुंबासह येणाºया एका दाम्पत्याला खेड-शिवापूर टोलनाक्याच्या अलीकडे एक तरुण दुचाकीस्वाराने ‘ओ गाडी थांबवा, टायरमध्ये हवा कमी झालीये’ असे सांगितले.
आधुनिक तंत्रज्ञानांनी सज्ज असलेल्या या गाडीत हवा कमी झाल्याचे निर्देशित केले जाते. तसे काहीही निर्देश न दिसल्याने संबंधित वाहनचालकाने या तरुणाला हात करून पुढे जाण्यास सांगितले. बराचवेळ हा युवक गाडीचा नंबर दिसू नये, म्हणून आपल्या गाडीच्या बरोबरीने गाडी चालवत असल्याचे पत्नीच्या निदर्शनास आले. त्यानंतर दोन-तीन दुचाकी पुढे जाऊन त्यावरील तरुण मागे चारचाकी वाहन थांबतेय का? याची खात्री करू लागले.
घडणाºया प्रसंगाची साखळी लावल्यानंतर आपण मोठ्या संकटात सापडण्याआधी योग्य यंत्रणांना याविषयी माहिती दिली पाहिजे, असे ठरवून या दाम्पत्याने टोलनाक्यावरील पोलिसांना माहिती दिली.
गेल्या काही दिवसांत असे प्रकार घडले असल्याचा दुजोरा पोलिसांनीही दिल्याने महामार्गावरील धोकादायक प्रवास पुन्हा एकदा अधोरेखित करण्यात आला आहे.
सुरूर परिसरातच काही दिवसांपूर्वी प्रवाशाला कारमध्ये घेतले होते. त्यानंतर गाडी शिरवळ हद्दीत आली असता पंक्चर झाल्याचे सांगत अंधारात बॅगेतील दागिने लंपास केल्याची घटना घडली होती.