आफ्रिकन पोपट हरविल्याने मालकाचा अन्नत्याग..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2019 12:09 PM2019-05-13T12:09:44+5:302019-05-13T12:11:35+5:30

शुद्ध इंग्रजीत बोलणाऱ्या पोपटाला त्यांनी मराठी आणि हिंदी भाषा शिकवली. मालक आल्यानंतर त्याचं स्वागत करायचं आणि पुढे त्यांचे जेवण होईपर्यंत खांद्यावर बसायचा हट्ट धरायचा, त्यांनी दिलेली फळं खायची..! कुटुंबातील व्यक्तीपेक्षा लळा लावणारा हा पोपट काही दिवसांपूर्वी घर सोडून निघून गेला आणि त्यांनी अक्षरश: अन्न त्यागाचा निर्णय घेतला.

The loss of the African parrot | आफ्रिकन पोपट हरविल्याने मालकाचा अन्नत्याग..

आफ्रिकन पोपट हरविल्याने मालकाचा अन्नत्याग..

Next
ठळक मुद्देआफ्रिकन पोपट हरविल्याने मालकाचा अन्नत्याग..घरातील सदस्य गेल्याचे दु:ख, पोलीस ठाण्यातही धाव

दत्ता यादव 

सातारा : शुद्ध इंग्रजीत बोलणाऱ्या पोपटाला त्यांनी मराठी आणि हिंदी भाषा शिकवली. मालक आल्यानंतर त्याचं स्वागत करायचं आणि पुढे त्यांचे जेवण होईपर्यंत खांद्यावर बसायचा हट्ट धरायचा, त्यांनी दिलेली फळं खायची..! कुटुंबातील व्यक्तीपेक्षा लळा लावणारा हा पोपट काही दिवसांपूर्वी घर सोडून निघून गेला आणि त्यांनी अक्षरश: अन्न त्यागाचा निर्णय घेतला.

साताऱ्यातील शाहूपुरी परिसरात राहणारे इम्तियाज सय्यद यांना पूर्वीपासूनच पक्षी पाळण्याचा छंद आहे. पाच वर्षांपूर्वी त्यांनी पुण्यातून पन्नास हजार रुपयांना आफ्रिकन पोपट विकत घेतला. या पोपटाला केवळ इंग्रजी भाषा अवगत होती. त्यामुळे सुरुवातीचे काही दिवस आफ्रिकन पोपटाला हिंदी आणि मराठी भाषा काहीच समजायची नाही. मात्र, तरीसुद्धा सय्यद यांनी पोपटाला आपली मातृभाषा शिकविण्याचा चंग बांधला.

विशेष म्हणजे केवळ दोन महिन्यांत त्यांनी या पोपटाला हिंदी आणि मराठी भाषा शिकवली. इंग्रजीमध्ये पटाईत असलेल्या या पोपटाने कसलेही आडेवेडे न घेता सय्यद यांच्याकडून हिंदी भाषा अत्यंत चपलखपणे शिकली. !चल आ जा, पाणी पी, खाना खाने का वक्त हो गया. जल्दी चल, आगे जा के बैठ जा,ह्ण असे बोलल्यानंतर आफ्रिकन पोपट त्यांचे ऐकून लगेच कृती करत होता.

गुड मॉर्निंग आणि गुड नाईट, हे पोपटाकडून ऐकले नाही तर सय्यद बैचेन व्हायचे. घरात गेल्यानंतर पोपट त्यांच्या खांद्यावर बसून त्यांचे स्वागत करायचा. सय्यद यांचे जेवण झाल्यानंतरच तो त्यांच्या खांद्यावरून उतरून स्वत: दिलेली फळे खात होता. सय्यद यांच्या मुलीचे लग्न झाल्यामुळे घरात दोघेच पती-पत्नी आणि घरातील तिसरा सदस्य म्हणून आफ्रिकन पोपटाला ते मानत होते.

दत्तक घेतलेला हा माझा मुलगा आहे, असे ते आपल्या ओळखीतील लोकांना आवर्जून सांगत होते. पाच वर्षे पोपटाच्या सहवासात कशी निघून गेली, हे त्यांना समजेलच नाही. मुलगी सासरी निघून गेल्याची कसर या पोपटाने भरून काढल्यामुळे त्यांना कधी मुलीची कमतरता भासली नाही.

असे असताना काही दिवसांपूर्वी हा आफ्रिकन पोपट अचानक घरातून निघून गेला. हे पाहून त्यांना जबर मानसिक धक्का बसलाय. पोपटाला शोधण्यासाठी त्यांनी जीवाचे रान केले. साताऱ्यातील एकही भाग उरला नाही की त्यांनी त्या ठिकाणी शोध घेतला नाही. एवढेच नव्हे तर त्यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन आफ्रिकन पोपट हरविल्याची तक्रारही नोंदविली. तसेच सोशल मीडियावरही पोपट आणून देणाºयास योग्य बक्षीसही दिले जाईल, असे त्यांनी आवाहन केलंय.

अद्याप पोपट न सापडल्याने त्यांनी अन्नत्याग करण्याचा निर्णय घेतलाय. मात्र, प्रकृतीवर परिणाम होत असल्यामुळे त्यांच्या मित्रांनी त्यांना यापासून परावृत्त करण्याचा सल्ला दिला आहे.

माझ्या मुलाला मारू नका

इम्तियाज सय्यद यांनी सोशल मीडियावर सातारकरांना भावनिक साद घातली आहे. आफ्रिकन पोपटाच्या फोटोखाली त्यांनी हा माझा मुलगा घरातून निघून गेला आहे. तो कोणाला सापडल्यास त्याला मारू नका. तो तुमच्या खांद्यावर बसेल, त्याला प्रेमाने बोला, असे आवाहन केले आहे.

 

Web Title: The loss of the African parrot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.