शेतबांध वाहून शेतकऱ्यांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:27 AM2021-06-18T04:27:30+5:302021-06-18T04:27:30+5:30
मसूर : मसूर परिसरात बुधवारी रात्रीपासून पडत असलेल्या पावसामुळे शेतांना तळ्यांचे स्वरुप आले आहे. बऱ्याच ठिकाणी शेतबांध वाहून गेल्याने ...
मसूर : मसूर परिसरात बुधवारी रात्रीपासून पडत असलेल्या पावसामुळे शेतांना तळ्यांचे स्वरुप आले आहे. बऱ्याच ठिकाणी शेतबांध वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.
परिसरात पडत असलेल्या पावसामुळे खरिपाची पेरणी झाली आहे. ज्या शेतात टोकणी झाली आहे, यासाठी वातावरण पोषक आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग समाधानी आहे. परंतु याच पावसाने शेतामध्ये तळी साचल्याने त्याठिकाणचे बियाणे उगवेल का, असाही प्रश्न निर्माण झाला आहे. शेताच्या कडेची ताल फुटल्याने शेती वाहून जाण्याचेही प्रकार घडले आहेत. या पावसाचा जोर इतका होता की, किमान चार ते पाच दिवस तरी पेरणी राहिलेल्या शेतात पेरणी करता येणार नाही. त्यामुळे पावसाने आता उघडीप द्यावी, असाही धावा शेतकरी करताना दिसत आहेत.
फोटो
सततच्या पडणाऱ्या पावसाने बेलवाडी येथील शेतात पाणी साचून तळे झाले आहे.