सोयाबीन पिकाचा शेतकऱ्यांना तोटा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:47 AM2021-09-09T04:47:29+5:302021-09-09T04:47:29+5:30

शेतकऱ्यांचा स्वप्नभंगच... सोयाबीन हे राज्यातील प्रमुख पीक आहे. प्रतिकूल हवामानामुळे गेल्या काही वर्षांत सोयाबीनवर किडीचा प्रादुर्भाव होत आहे. सोयाबीनवर ...

Loss of soybean crop to farmers ... | सोयाबीन पिकाचा शेतकऱ्यांना तोटा...

सोयाबीन पिकाचा शेतकऱ्यांना तोटा...

Next

शेतकऱ्यांचा स्वप्नभंगच...

सोयाबीन हे राज्यातील प्रमुख पीक आहे. प्रतिकूल हवामानामुळे गेल्या काही वर्षांत सोयाबीनवर किडीचा प्रादुर्भाव होत आहे. सोयाबीनवर उंट अळी, पाने पोखरणारी अळी, चक्री भुंगा आढळतो, तर खोडमाशीमुळे सोयाबीनचे १०० टक्क्यांपर्यंत नुकसान होऊ शकते. सोयाबीनवरील किडींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध औषधे उपलब्ध आहेत. एवढे सारे धोके असतानाही शेतकरी सोयाबीन पीक घेऊन चार पैसे मिळतील, या आशेवर असतो. पण, अनेकवेळा त्याचा स्वप्नभंगच होतो.

कोट :

शेतकरी कंगाल आणि व्यापारी मालामाल, हेच चित्र आतापर्यंत दिसून आले आहे. शेतीमाल संपतो तेव्हा त्याचा दर वाढविला जातो, तर आवक वाढली की पाडला जातो. सोयाबीनच्या बाबतीत असेच दिसून येत आहे. यामुळे दर कमी मिळाल्याने शेतकरी आपले स्वप्न पूर्ण करू शकत नाही.

- राजू शेळके, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना

.......................................................................

Web Title: Loss of soybean crop to farmers ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.