कोयनेच्या अनेक वाहनांचा खुळखुळा : चालू वाहनांचीही दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2018 12:23 AM2018-11-07T00:23:25+5:302018-11-07T00:25:11+5:30

महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असणाऱ्या कोयना नदीवरील धरण व जलविद्युत प्रकल्पाने महाराष्ट्राच्या पिण्याचे पाणी व शेतीच्या सिंचनाचा प्रश्न मार्गी लावला आहे. येथील जलसिंचन विभागाच्या अंतर्गत विविध उपविभाग कार्यरत आहेत.

Lots of Koyanee vehicles: The current downstream disaster | कोयनेच्या अनेक वाहनांचा खुळखुळा : चालू वाहनांचीही दुरवस्था

कोयनेच्या अनेक वाहनांचा खुळखुळा : चालू वाहनांचीही दुरवस्था

Next
ठळक मुद्देसहा वाहने बंद स्थितीत ; जलसिंचन विभागाकडे कमतरता

कोयनानगर : महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असणाऱ्या कोयना नदीवरील धरण व जलविद्युत प्रकल्पाने महाराष्ट्राच्या पिण्याचे पाणी व शेतीच्या सिंचनाचा प्रश्न मार्गी लावला आहे. येथील जलसिंचन विभागाच्या अंतर्गत विविध उपविभाग कार्यरत आहेत. या विभागातील अधिकारी कर्मचाºयांना वाहनांची आवश्यकता असते. मात्र, कोयना जलसिंचन विभागाकडील अकरा वाहनांपैकी सहा वाहने पूर्ण बंद अवस्थेत आहेत.

या वाहनांअभावी चालकांना काम करावे लागत आहेत. विद्युतनिर्मित व पाणीसाठ्यासाठी महाराष्ट्रात कोयना प्रकल्प अग्रेसर आहे. या प्रकल्पातील अधिकारी, कर्मचाºयांना वाहनांच्या कमतरतेने व नादुरुस्तीमुळे प्रकल्पाच्या ठिकाणी ये-जा करण्यासाठी व इतर ठिकाणी कामानिमित्त जाताना गैरसोय होत आहे. तरी प्रशासनाने या प्रकल्पाच्या सोयी-सुविधा व देखभालीकडे लक्ष द्यावे लागते.


 

सुमारे १०५.२५ टीएमसी एवढ्या मोठ्या क्षमतेने पाणीसाठा असणारा कोयना प्रकल्प महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र राज्यांसाठी वरदान ठरलेला आहे. परंतु हा प्रकल्प देखभाल दुरुस्ती व सोयी सुविधेअभावी दुर्लक्षित होत आहे. कोयनानगरला धरणाची निर्मिती झाल्यानंतर १९६७ मध्ये भूकंपाच्या धक्क्याने हादरलेल्या प्रकल्पाने काही वर्षांत उभारी घेतली. कोयना भाग निसर्गाने बहारलेला आहे. तसा कोयना धरण विविध कार्यालये व जलविद्युत प्रकल्पामुळे कोयना नगरी व परिसर समृद्ध झाला होता. परंतु गत काही वर्षांपासून कोयना प्रकल्पाला ग्रहण लागले असून, कोयनेतील अनेक शासकीय कार्यालये इतरत्र हलविण्यात आली तर येथे सुरूअसणारी प्रकल्पातील अनेक कामे ठप्प झाली.

नेहरू गार्डन, पॅगोडा, विश्रामगृह आदींची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे कोयनाप्रकल्पासह कोयना बकाल व ओसाड झाली आहे. या प्रकल्पाने राज्याला खूप दिले. मात्र, त्याबदल्यात या प्रकल्पाला व प्रकल्पग्रस्तांना शासन व प्रशासन पातळीवर दखल घेतली गेली नाही. कोयना जलसिंचन विभागा अंतर्गत सिंचन विभाग, धरण व्यवस्थापन उपविभाग, रस्ते व इमारती उपविभाग, उपकरण उपविभाग, बांधकाम उपविभाग क्रमांक दोन, कोयना प्रकल्प रुग्णालय कोयना, पाटण सिंचन उपविभाग, कोयना सिंचन उपविभाग, कोयना प्रकल्प रुग्णालय अलोरे, कोळकेवाडी धरण व्यवस्थापन उपविभाग तारळी सिंचन उपविभाग आदी विभाग आहेत.

या विभागातील अभियंता व अधिकाºयांसाठी कोयना जलसिंचन विभागाकडे सध्या अकरा वाहने उपलब्ध असून, यातील दोनच वाहने सुस्थितीत असून, तीन वाहने वारंवार बंद पडत आहेत तर यातील सहा वाहने गेली कित्येक महिने नादुरुस्त अवस्थेत आहेत. यातील बहुतांशी वाहने वीस-पंचवीस वर्षांची जुनी असल्याने ती दुरुस्त होऊ शकत नाहीत. वाहनांचे सर्व्हे रिपोर्ट केले असून, वरिष्ठ कार्यालयाला माहिती देण्यात आली. बंद वाहनांचे निर्लेखन करण्याची प्रक्रिया सुरू आहे. कोयना प्रकल्पातील वाहनांची कमतरता व बिघाडामुळे संबंधित विभागाच्या अधिकारी, कर्मचाºयांना प्रकल्पाच्या ठिकाणी जाताना गैरसोय होत आहे. तर वाहनचालकांना वाहनांअभावी कामे करावी लागत आहेत....

वाहनांवर धुळीचे साम्राज्य
कोयना जलसिंचन विभागाकडे सध्या एकूण अकरा वाहने आहेत. यातील कोयनेतील सातपैकी तीन वाहने सुरू आहेत. तर चार बंद अवस्थेत आहेत. अलोरे येथे दोनपैकी एक वाहन सुरू आहे तर सातारा येथील दोनपैकी एक वाहन सुरू आहे. सध्या बंद अवस्थेतील वाहनांवर मोठ्या प्रमाणात धूळ साचली आहे.

रुग्णवाहिकांनाही  मिळेना चालक
कोयना प्रकल्पांतर्गत कोयना व अलोरे येथे रुग्णालय असून, कोयनानगर येथील रुग्णालयाची रुग्णवाहिका कित्येक वर्षांपासून बंद आहे. तर अलोरे येथील रुग्णवाहिका असून, त्यावरील चालक पद रिक्त आहे. त्यामुळे वाहने चालकांअभावी उभी आहेत. या प्रकल्पातील कर्मचारी व स्थानिकांना उपचारासाठी १०८ किंवा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेची मदत घ्यावी लागत आहे.

 

कोयना प्रकल्पाचा विस्तार व सुरक्षिततेचा विचार केल्यास याठिकाणी नवीन आधुनिक सोयीची वाहने असणे गरजेचे आहे. शासन व प्रशासन व लोकप्रतिनिधींनी या प्रकल्पातील आवश्यक कामासाठी निधीची तरतूद करावी. कोयना जलसिंचन प्रकल्पातील प्रत्येक विभाग व उपविभागाला एक वाहनांची आवश्यकता आहे. मात्र वाहने सुस्थितीत नसल्याने कर्मचाºयांवर कामाचा ताण येत आहे.
- वैशाली नारकर, अधीक्षक अभियंता, कोयना सिंचन प्रकल्प

Web Title: Lots of Koyanee vehicles: The current downstream disaster

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Damcarधरणकार