Satara: प्रेमीयुगुलाने तलावात उडी घेऊन संपवले जीवन, मृतदेहांचा शोध सुरू 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2023 11:50 AM2023-10-02T11:50:37+5:302023-10-02T11:52:54+5:30

सोबत असलेल्या व्यक्तीने सातारा तालुका पोलिसांना दिली माहिती

Lovers end their lives by jumping into lake in satara, search for bodies begins | Satara: प्रेमीयुगुलाने तलावात उडी घेऊन संपवले जीवन, मृतदेहांचा शोध सुरू 

संग्रहित छाया

googlenewsNext

सातारा : येथील शाहूपुरी दिव्यनगरीतून कोंडवेकडे जाणाऱ्या रस्त्यालगत असणाऱ्या तलावात उडी मारून प्रेमीयुगुलाने आपले जीवन संपवले. ही धक्कादायक घटना रविवारी दुपारी साडेचारच्या सुमारास घडली. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत मृतदेहांचा शोध सुरू होता.

अक्षय ज्योतीराम पवार (वय २६), गौरी चव्हाण (२३, दोघेही रा. दिव्यनगरी, सातारा) असे आत्महत्या केलेल्या प्रेमीयुगुलाचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दिव्यनगरी रस्त्यावरील कोंडवे (ता. सातारा) गावच्या हद्दीत संबंधित युवक-युवती दुचाकीवरून तेथे गेले. त्यावेळी त्यांच्यासोबत आणखी एकजण होता. तरुणीने बोलता-बोलताच अचानक तलावात उडी मारली. त्यानंतर तरुणानेही तिच्या पाठोपाठ उडी मारली. काही क्षणातच दोघेही तलावात बुडाले. सोबत असलेल्या व्यक्तीने या प्रकाराची माहिती सातारा तालुका पोलिसांना दिली. त्यानंतर तातडीने पोलिस घटनास्थळी पोहोचले. 

पोलिसांनी संबंधित व्यक्तीकडे चाैकशी केल्यानंतर या दोघांची नावे निष्पन्न झाली. प्रेम प्रकरणातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचे बोलले जात आहे. शिवेंद्रसिंहराजे रेस्क्यू टीमच्या जवानांनी अंधार तसेच भर पावसातही तलावात उतरून शोधकार्य सुरू केले. मात्र, रात्री उशिरापर्यंत संबंधित प्रेमीयुगुलाचा शोध लागला नाही. सातारा तालुका पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली नव्हती.

नातेवाइकांकडे चाैकशी

हे दोघे एकमेकांना केव्हापासून ओळखत होते, कोणत्या कारणातून त्यांनी टोकाचे पाऊल उचलले, यासह अन्य कारणांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी नातेवाइकांकडे चाैकशी सुरू केली आहे. जेव्हा ही घटना घडली तेव्हा या दोघांच्या सोबत असलेली व्यक्ती त्यांच्याजवळची असल्याचे समजते.

Web Title: Lovers end their lives by jumping into lake in satara, search for bodies begins

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.