कलानगरला कमी दाबाने पाणी

By admin | Published: December 14, 2015 10:17 PM2015-12-14T22:17:49+5:302015-12-14T22:19:10+5:30

कलानगरला कमी दाबाने पाणी

Low pressure water to Kalanagar | कलानगरला कमी दाबाने पाणी

कलानगरला कमी दाबाने पाणी

Next

इंदिरानगर : कलानगरमध्ये अत्यंत कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास पाणीपट्टी न भरण्याचा इशारा संतप्त महिलांनी दिला आहे. पाणीपुरवठा विभाग आणि लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे.
कलानगरमध्ये अपार्टमेंट व सोसायटी दिवसागणिक वाढत आहेत. त्याचबरोबर नवनवीन समस्या उद्भवत आहे. यामध्ये अत्यंत कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा गंभीर समस्या बनली आहे.
परिसरामध्ये सुमारे तीन वर्षांपासून ओंकार अपार्टमेंट, ओमेघा अपार्टमेंटसह परिसरात अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. करंगळी इतकी बारीक धार नळास असल्याने पिण्याचे पाणीसुद्धा भरले जात नाही, तर वापरण्यासाठी आणायचे कोठून, असा प्रश्न निर्माण झाला आहे. दररोज दुपारी तीन वाजेच्या दरम्यान पाणी येते तेव्हा महिलावर्गाची तारेवरची कसरत होते. पाणी भरले जात नाही म्हणून गेल्या चार महिन्यांपासून एक दिवसाआड स्वखर्चाने पाण्याचा टँकर मागविला जात आहे.
पाणीपुरवठा सुरळीत व्हावा म्हणून पाणीपुरवठा अधिकारी आणि लोकप्रतिनिधीकडे तक्रार करून दखल घेतली जात नाही. पाणीपुरवठा सुरळीत होत नाही. जोपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत होत नाही तोपर्यंत पाणीपट्टी न भरण्याचा इशारा संतप्त आशा शेट्टी, संध्या जावीर, राधिका बेलगावकर, विमला नाईक, शोभना कुलकर्णींसह महिलावर्गांनी दिला आहे. (वार्ताहर)

Web Title: Low pressure water to Kalanagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.