पश्चिमेला पावसाचा जोर कमी; कोयना धरणातून विसर्ग सुरूच..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:49 AM2021-09-16T04:49:25+5:302021-09-16T04:49:25+5:30

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात तीन दिवस चांगला पाऊस झाल्यानंतर मंगळवारपासून जोर कमी झाला आहे. बुधवारी सकाळपर्यंत महाबळेश्वरला सर्वाधिक ...

Low rainfall intensity in the west; Visarga continues from Koyna dam .. | पश्चिमेला पावसाचा जोर कमी; कोयना धरणातून विसर्ग सुरूच..

पश्चिमेला पावसाचा जोर कमी; कोयना धरणातून विसर्ग सुरूच..

googlenewsNext

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात तीन दिवस चांगला पाऊस झाल्यानंतर मंगळवारपासून जोर कमी झाला आहे. बुधवारी सकाळपर्यंत महाबळेश्वरला सर्वाधिक ५३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे; तर कोयेनेचे दरवाजे सवा पाच फुटांवर स्थिर असून, धरणातून एकूण ४८६२० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

जिल्ह्याच्या मागील १५ दिवसांपासून पाऊस सुरू झाला आहे. त्यापूर्वी एक महिना पावसाची दडी होती. अपवाद वगळता पश्चिम भागात तुरळक प्रमाणात पाऊस झाला; तर पूर्वेकडे पावसाची उघडीप होती. आता मागील काही दिवसांपासून पाऊस होत असल्याने खरीप हंगामातील पिकांना फायदा झाला आहे. तसेच पश्चिम भागातील प्रमुख धरणांत वेगाने साठा वाढला. यामुळे वर्षभराची चिंता मिटली आहे. असे असले तरी मंगळवारपासून पाऊस कमी झाला आहे.

बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे ३४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली, तर जूनपासून ४१८८ मिलिमीटर पाऊस पडला आहे. नवजाला ३२ आणि यावर्षी आतापर्यंत ५४९२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्याचबरोबर महाबळेश्वरला सकाळपर्यंत ५३ आणि जूनपासून ५५५८ मिलिमीटर पाऊस पडला आहे. सकाळच्या सुमारास कोयना धरणात ४८६२० क्युसेक वेगाने पाण्याची आवक होत होती, तर धरणातून एकूण ४८६२० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. पायथा वीजगृहातून २१०० आणि सहा दरवाजांतून ४६५२० असा एकूण ४८६२० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. धरणातून सोडण्यात येणारे पाणी कोयना नदीत जात आहे. त्यामुळे नदीची पाणीपातळी वाढली आहे.

चौकट :

धोम, कण्हेरमधून विसर्ग सुरू...

पश्चिम भागात पाऊस सुरू आहे. त्यामुळे धरणांत मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झालेला आहे. धोम धरणात ९८.८० टक्के पाणीसाठा झाला आहे. कण्हेरमध्ये ९९.३९, कोयना ९८.६७, उरमोडी ९१.१२, बलकवडी ९९.३९ आणि तारळी धरणात ९४.२८ टक्के पाणीसाठा आहे. त्याचबरोबर सध्या धोममधून ३७५, कण्हेर १४६३, बलकवडी ११६३ आणि तारळी धरणातून ६८४ क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.

..........................................................

Web Title: Low rainfall intensity in the west; Visarga continues from Koyna dam ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.