कोपर्डे हवेलीत एक लाखाची कुस्ती बरोबरीत

By Admin | Published: May 18, 2016 09:58 PM2016-05-18T21:58:10+5:302016-05-19T00:16:17+5:30

कुस्तीचे आयोजन शिवसंग्रामचे शिवाजीराव चव्हाण, कऱ्हाड उत्तरचे युवक काँग्रेसचे अध्यक्ष शैलेश चव्हाण यांनी केले

A lucky wrestling match with Koperde Haveli | कोपर्डे हवेलीत एक लाखाची कुस्ती बरोबरीत

कोपर्डे हवेलीत एक लाखाची कुस्ती बरोबरीत

googlenewsNext

कोपर्डे हवेली : कोपर्डे हवेली येथे कुस्त्यांच्या मैदानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रथम क्रमांकाची इनाम १ लाखाची कुस्ती बरोबरीत सुटली तर अनेक कुस्त्या निकाली झाल्या. अटीतटीच्या झालेल्या कुस्त्यांमुळे प्रेक्षकांच्या नजरेने पारणे फिटले.
पैलवान विजय गुटाळ विरुद्ध पैलवान गोकूळ अवारे यांची कुस्ती बरोबरीत सुटली. पैलवान गुटाळ यांच्या पायाला दुखापत झाल्याने ही कुस्ती सोडवण्यात आली. दुसरी कुस्ती पैलवान विनोद शिंदे, कोल्हापूर याने अजय निकम, साखराळे याला पोकळ घिस्सा डावावर चितपट करून पे्रक्षकांच्या डोळ्याचे पारणे फेडले, तर दुसऱ्या क्रमांकाच्या दुसऱ्या कुस्तीमध्ये नयन निकम, कोल्हापूर यांना विजयी घोषित करण्यात आले. पैलवान संग्राम पाटील आटकेकर यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यावर मात केल्याने प्रेक्षकांनी त्यांना डोक्यावर घेतले. पैलवान तानाजी चव्हाण, साखराळे यांनी पैलवान गोरख जाधव, कोल्हापूर याला ढाक डावावर चितपट करून ते विजयी झाले. पैलवान सागर साळवे, पुणे याने हरी रुंदवे यांच्यावर मात करून निकाली कुस्ती केली. पैलवान गौरव हजारे, कऱ्हाड, इंद्रजित तणपुरे, कोणेगाव, पवन शिंदे, अंतवडी, रोहित चव्हाण, कोपर्डे, इंद्रजित पवार, वडोली निळेश्वर यांच्या कुस्त्या चटकदार झाल्या.पंच म्हणून शिवछत्रपती पुरस्कार विजेते पैलवान नसरूद्दीन नायकवडी, धनाजी पाटील, जालिंदर चव्हाण, सुनील पोळ, बाबूराव चव्हाण, भास्कर चव्हाण यांनी काम पाहिले.कुस्तीचे आयोजन शिवसंग्रामचे शिवाजीराव चव्हाण, कऱ्हाड उत्तरचे युवक काँग्रेसचे अध्यक्ष शैलेश चव्हाण यांनी केले होते. (वार्ताहर)

कोपर्डे हवेली येथे प्रथम क्रमांकाची कुस्ती बरोबरीत सोडविताना रामकृष्ण वेताळ, संदीप मोझर, पैलवान धनाजी पाटील.

Web Title: A lucky wrestling match with Koperde Haveli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.