माण, फलटणला काँग्रेसची गद्दारी राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांचा आरोप

By admin | Published: May 18, 2014 12:05 AM2014-05-18T00:05:03+5:302014-05-18T00:07:15+5:30

सातारा : माढा लोकसभा मतदारसंघातील ‘माण’ आणि ‘फलटण’ या दोन विधानसभा मतदारसंघांत तसेच सातारा लोकसभा मतदारसंघातील

Maan, Phaltan, NCP's district president accused of betraying Congress | माण, फलटणला काँग्रेसची गद्दारी राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांचा आरोप

माण, फलटणला काँग्रेसची गद्दारी राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांचा आरोप

Next

 सातारा : माढा लोकसभा मतदारसंघातील ‘माण’ आणि ‘फलटण’ या दोन विधानसभा मतदारसंघांत तसेच सातारा लोकसभा मतदारसंघातील ‘कºहाड दक्षिण’मध्ये काँग्रेसने गद्दारी केल्याचा घणाघाती आरोप राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्षडॉ. दिलीपराव येळगावकर यांनी केला आहे. सातारा लोकसभा मतदारसंघातून उदयनराजे विक्रमी मतांनी तर ‘माढा’मधून विजयसिंह मोहिते-पाटील फार कमी मताधिक्याने विजयी झाले. फलटणमध्ये काँग्रेसने आघाडीधर्म पाळल्यामुळेच राष्ट्रवादीचे विजयसिंह मोहिते-पाटील विजयी झाल्याचा दावा दिगंबर आगवणे यांनी काल, शुक्रवारी केला होता. मात्र, ‘माढा’च्या कमी मताधिक्याला राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉ. दिलीपराव येळगावकर यांनी थेट काँग्रेसला जबाबदार धरले आहे. ‘यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काँगे्रसने गद्दारी केली आहे,’ असा आरोप येळगावकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला. सातारा लोकसभा मतदारसंघात समाविष्ट असणार्‍या ‘कºहाड दक्षिण’मध्ये डॉ. अतुल भोसले यांनी काम केले नसल्याच्या लेखी तक्रारी राष्ट्रवादीकडे आल्याचे येळगावकर यांनी सांगितले. डॉ. येळगावकर म्हणाले, खटाव तालुक्यात निमसोडचे रणजितसिंह देशमुख, वडूजचे दादासाहेब गोडसे, कलेढोणचे हणमंतराव साळुंखे आणि माणमध्ये पंचायत समिती सदस्य शेखर गोडसे, विश्वंभर बाबर आणि त्यांच्या समवेतच्या कार्यकर्त्यांनी आघाडीधर्माचे प्रामाणिकपणे पालन केले. मात्र, बाकीच्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी आघाडीधर्माचे पालन न करता राष्ट्रवादी उमेदवाराच्या विरोधात काम केले. तरीही माण विधानसभा मतदारसंघात आघाडी घेतली. डॉ. येळगावकर म्हणाले, ‘फलटणमध्ये मुख्यमंत्र्यांनी सूचना देऊनदेखील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ऐकले नाही. त्यांनी वरवरचे काम केले. मुख्यमंत्र्यांनी ही बाब गांभीर्याने घ्यावी, अशी मागणी आम्ही करणार आहे.’ (प्रतिनिधी)

Web Title: Maan, Phaltan, NCP's district president accused of betraying Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.