लोहारेच्या सरपंचपदी मदन जाधव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:39 AM2021-02-16T04:39:51+5:302021-02-16T04:39:51+5:30
वाई : लोहारेच्या सरपंचपदी डॉ. मदन सर्जेराव जाधव यांची व उपसरपंचपदी अश्विनी सचिन सावंत यांची निवड झाली आहे. आमदार ...
वाई : लोहारेच्या सरपंचपदी डॉ. मदन सर्जेराव जाधव यांची व उपसरपंचपदी अश्विनी सचिन सावंत यांची निवड झाली आहे.
आमदार मकरंद पाटील यांचे समर्थक व कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती मोहन जाधव यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने ग्रामपंचायतीत बाजी मारून राष्ट्रवादीचा किल्ला अबाधित राखला.
निवडीनंतर आयोजित बैठकीत सरपंच डॉ. मदन जाधव म्हणाले, ‘गावातील सर्व घटकांना एकत्र घेऊन विकासाच्या विविध योजना राबविणार आहे. आरोग्य, शिक्षण, मूलभूत सुविधा, महिला सबलीकरण यामध्ये विशेष काम करणार आहे.’
यावेळी नवनिर्वाचित सदस्य विठ्ठल भिलारे, मनीषा गुरव उपस्थित होत्या. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंडल अधिकारी नरेंद्र गायकवाड यांनी काम पाहिले. त्यांना ग्रामसेवक सोनावणे यांनी सहकार्य केले.
नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व सदस्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी बाळासाहेब भिलारे, विजय भिलोरे, जिजाबा भिलारे, तुषार भिलारे, महादेव भिलारे, राजेंद्र भिलारे, सुरेश भिलारे, विलास सावंत, रमेश सावंत, हणमंत सावंत, अमर सावंत, हणमंत बाबर, निवृत्ती भोसले, लक्ष्मण भोसले, सुनील भोसले, भिकू इथापे, जगन्नाथ गुरव, अमित शेलार, अभिषेक शेलार, प्रदीप शेलार, सिध्दार्थ शेलार, ज्ञानेश्वर संकपाळ, किरण पिसाळ, साहेबराव भोईटे उपस्थित होते.
चौकट :
‘भाजप’ची कडवी झुंज
तालुक्यातील राजकीय पटलावर महत्त्वाची असलेली लोहारे ग्रामपंचायत अनेक वर्षे राष्ट्रवादीच्या ताब्यात होती. यामध्ये भाजपचे दत्तात्रय ढेकाणे व वैभव सावंत यांच्या नेतृत्वाखाली भैरवनाथ ग्रामविकास परिवर्तन पॅनेलने कडवी झुंज देऊन सातपैकी तीन जागांवर विजय मिळविला. यामध्ये भैरवनाथ पॅनेलच्या मंगल कोंडीराम सावंत, नंदा जयवंत शेलार, प्रशांत शंकर गुरव यांनी विजयश्री खेचून आणल्याने राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात भाजपने ही कडवी झुंज दिली.
आयकार्ड
१५मदन जाधव
१५अश्विनी सावंत