मॅगीचा दावा फसवा !

By Admin | Published: July 3, 2015 09:55 PM2015-07-03T21:55:43+5:302015-07-04T00:03:56+5:30

वैद्यकीय अहवाल प्राप्त : तपासणीत आढळले मोनोसोडियम ग्लुटामेट

Magi claim fraud! | मॅगीचा दावा फसवा !

मॅगीचा दावा फसवा !

googlenewsNext

सातारा : मॅगी उत्पादकांनी मॅगीमध्ये मोनोसोडियम ग्लुटामेट या घातक पदार्थाचा वापर केला नसल्याचा दावा केला असला तरी प्रयोगशाळेच्या अहवालामध्ये या पदार्थाचा वापर केला जात असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे नेस्ले कंपनीचा दावा फोल ठरला आहे.मॅगीच्या पुड्यावर मॅगीमध्ये मोनोसोडियम ग्लुटामेट चा वापर करत नसल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. मात्र, हा उल्लेख फसवा असल्याचे तपासणीत स्पष्ट झाले. मॅगीमध्ये मोनोसोडियम ग्लुटामेट आणि शिशाचं प्रमाण मर्यादेपेक्षा जास्त वापरल्याचे आढळून आले होते. त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाने मे महिन्यात मॅगीचा परवाना रद्द करून देशात मॅगीच्या विक्रीवर बंदी आणावी, अशी शिफारस केंद्रीय अन्न सुरक्षा प्राधिकरणाकडे केली होती. त्यानुसार देशभरातील मॅगीचे नमुने गोळा करून त्याची तपासणी करण्यात आली. दरम्यान, सातारा जिल्ह्यातून मॅगीचे ४ व आयटीसीचा एक प्रोडक्ट तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी एकाचा अहवाल प्राप्त झाला. अन्न व औषध प्रशासनाने त्याबाबत कारवाई सुरू केली आहे. जूनमध्ये आरोग्यास अपायकारक असलेल्या मॅगीतून जिल्हा मुक्त करण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने मॅगीच्या सुपरस्टॉकिस्ट व डिस्ट्रीब्युटर्सना नोटिसा बजावून दोनच दिवसांत जिल्ह्यातून तब्बल ६५ लाखा रुपये किमतीचे मॅगीचे बॉक्स नेस्ले इंडिया प्रा. या कंपनीला परत पाठविण्यात आले होते. आणखी तीन नमुन्यांचे अहवाल येत्या दोन दिवसांत प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई करणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनातर्फे देण्यात आली. (प्रतिनिधी)

नेस्ले कंपनीचे चार व आयटीसी कंपनीचा एक नमुना तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आला होता. यापैकी नेस्ले कंपनीच्या मॅगीचा एक अहवाल प्राप्त झाला असून, त्यामध्ये मोनोसोडियम ग्लुटामेटचा वापर होत असल्याचा स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आम्ही उत्पादक अहवाल प्राप्त झाल्यानंतर तो वरिष्ठांकडे कारवाईसाठी पाठविणार आहोत.
- राजेंद्र रुणवाल
सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन विभाग

Web Title: Magi claim fraud!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.