महाविकास आघाडीच्या नेत्यांना सातारा जिल्ह्यात फिरू देणार नाही, भाजपाचा इशारा 

By दीपक देशमुख | Published: October 21, 2023 03:43 PM2023-10-21T15:43:22+5:302023-10-21T15:43:54+5:30

कंत्राटी भरतीच्या निर्णय महाविकास आघाडीचाच, जनतेची माफी मागावी

Maha Vikas Aghadi leaders will not be allowed to move around in Satara district, warns BJP | महाविकास आघाडीच्या नेत्यांना सातारा जिल्ह्यात फिरू देणार नाही, भाजपाचा इशारा 

महाविकास आघाडीच्या नेत्यांना सातारा जिल्ह्यात फिरू देणार नाही, भाजपाचा इशारा 

सातारा : महाविकास आघाडीच्या कार्यकाळामध्ये राज्य सरकारने विधिमंडळाचा ठराव संमत करून अधिकारी व कर्मचारी कंत्राटी पद्धतीने भरण्याचा निर्णय घेतला. या घटनेचा निषेध करण्यासाठी भाजपाच्या वतीने सातारा येथील पाेवई नाक्यावर आंदोलन केले. खा. शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या नेत्यांनी जनतेची माफी मागावी, अन्यथा जिल्ह्यात फिरू देणार नसल्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

सातारा येथील पोवई नाक्यावर भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने करण्यात आली. युवकांच्या आशेवर पाणी फिरवणारा कंत्राटी भरतीच्या निर्णय घेतल्याबद्दल जनतेची माफी मागावी, अन्यथा आणखी मोठे आंदोलन करण्याचा इशारा यावेळी त्यांनी दिला.

यावेळी यावेळी शहराध्यक्ष विकास गोसावी, जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेटवार, नगरसेवक धनंजय जांभळे, उपाध्यक्ष राहुल शिवनामे, कोषाध्यक्ष किशोर गोडबोले, सरचिटणीस प्रवीण शहाणे, विक्रांत भोसले, उपाध्यक्ष नितीन कदम, चिटणीस सुनील जाधव, तालुकाध्यक्ष गणेश पालखे आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Maha Vikas Aghadi leaders will not be allowed to move around in Satara district, warns BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.