महाबळेश्वरनेही ओलांडला ३ हजार मिलिमीटरचा टप्पा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2020 04:07 PM2020-08-12T16:07:46+5:302020-08-12T16:09:01+5:30

सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस सुरूच असून बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत नवजा येथे ७५, कोयनानगरला ५९ आणि महाबळेश्वरमध्ये ६६ मिलिमीटर पाऊस झाला. तर नवजानंतर आता महाबळेश्वरच्या पावसानेही या वर्षातील ३ हजार मिलिमीटरचा टप्पाही ओलांडला. तसेच कोयना धरणात दिवसांत सुमारे दीडने वाढ होऊन ७७ टीएमसी साठा झाला होता.

Mahabaleshwar also crossed the 3000 mm stage | महाबळेश्वरनेही ओलांडला ३ हजार मिलिमीटरचा टप्पा

महाबळेश्वरनेही ओलांडला ३ हजार मिलिमीटरचा टप्पा

Next
ठळक मुद्देमहाबळेश्वरनेही ओलांडला ३ हजार मिलिमीटरचा टप्पापश्चिम भागात पाऊस सुरूच : कोयना धरणात ७७ टीएमसी साठा

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस सुरूच असून बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत नवजा येथे ७५, कोयनानगरला ५९ आणि महाबळेश्वरमध्ये ६६ मिलिमीटर पाऊस झाला. तर नवजानंतर आता महाबळेश्वरच्या पावसानेही या वर्षातील ३ हजार मिलिमीटरचा टप्पाही ओलांडला. तसेच कोयना धरणात दिवसांत सुमारे दीडने वाढ होऊन ७७ टीएमसी साठा झाला होता.

बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे ५९ तर जूनपासून आतापर्यंत २८२७ मिलिमीटर पाऊस झाला आहे. तर महाबळेश्वरला ६६ आणि आतापर्यंत ३०३८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्याचबरोबर नवजाला सकाळपर्यंत ७५ आणि आतापर्यंत ३१२५ मिलिमीटर पाऊस झाला आहे. या पावसामुळे कोयना धरणात पाण्याची आवक होत आहे.

बुधवारी सकाळच्या सुमारास कोयना धरणात १५५९९ क्यूसेक वेगाने पाणी येत होते. त्यामुळे धरणातील पाणीसाठा ७६.८१ टीएमसी इतका झाला होता. २४ तासांत धरणसाठ्यात जवळपास दीड टीएमसीने वाढ झाली. तर दुपारी १२ च्या सुमारास कोयना धरणातील पाणीसाठा ७७ टीएमसी इतका झाला होता.

 

Web Title: Mahabaleshwar also crossed the 3000 mm stage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.