महाबळेश्वरला सहा दिवसांत साठ हजार पर्यटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2018 10:18 PM2018-12-30T22:18:46+5:302018-12-30T22:18:51+5:30

महाबळेश्वर : निसर्गाची जादूनगरी महाबळेश्वरमध्ये नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सहा दिवसांत साठ हजार पर्यटकांनी भेट दिल्याने परिसर गजबजून गेला आहे. ...

Mahabaleshwar has 60,000 tourists in six days | महाबळेश्वरला सहा दिवसांत साठ हजार पर्यटक

महाबळेश्वरला सहा दिवसांत साठ हजार पर्यटक

Next

महाबळेश्वर : निसर्गाची जादूनगरी महाबळेश्वरमध्ये नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सहा दिवसांत साठ हजार पर्यटकांनी भेट दिल्याने परिसर गजबजून गेला आहे. पर्यटकांच्या गर्दीमुळे मुख्य बाजारपेठेला जत्रेचे स्वरूप मिळालेले आहे. दरम्यान, सलग तिसऱ्या दिवशी तापमान गोठल्याने वेण्णा तलाव परिसरात हिमकणांचा आनंद घेण्यासाठी एकच गर्दी केली होती.
नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबई, पुणे, गुजरात तसेच राज्यातील विविध जिल्ह्यांतील पर्यटकांनी गर्दी केली आहे. अनेक पर्यटक महाबळेश्वरच्या गुलाबी थंडीची मजा व फ्रेश स्ट्रॉबेरी लालचुटूक फळाचा आनंद लुटण्यासाठी आलेले आहेत. पर्यटकांसाठी बाजारपेठा सज्ज झाल्या असून, महाबळेश्वरमध्ये लिंगमळा, अवकाळी, मेटगुताड, तळदेव, तापोळा, भेकवली, माच्युतर या गावामध्ये उत्पादित होणारी स्ट्रॉबेरी दुकानाच्या बाजू बाजूला मोठ्या प्रमाणात स्ट्रॉबेरी विक्रेते बसलेले दिसून येत आहे. स्ट्रॉबेरी खरेदी करण्यासाठी पर्यटकांची अक्षरक्ष: झुंबड उडत असल्याची दिसून येत आहे.
थंडीच्या मोसमातील कडाक्याच्या थंडीमुळे दवबिंदू गोठून हिमकण दिसण्याची आजची ही चौथी वेळ असून, सलग तीन दिवस हिमकण दिसत आहे. यावर्षी ११ डिसेंबर रोजी प्रथम हिमकण तयार झाले होते. वेण्णा तलावावरील जेटी, वाहनांचे टप, स्मृतिवनातील वेली, रानफुले, झाडेझुडपे, गवताचे पठार सर्वत्रच हिमकण पाहावयास मिळत आहेत. त्याचा स्थानिकांसह पर्यटक आनंद घेत आहेत. महाबळेश्वरच्या नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदेंसह नगरसेविका आफरीन वारुणकर यांच्यासह कुटुंबिय पर्यटकांमध्ये सहभाग होता.
स्टॉबेरी खरेदीसाठी गर्दी
सध्या महाबळेश्वरमध्ये थंडीचे प्रमाण जास्त असल्यामुळे आजपर्यंतची हिमकण तयार झाल्याची नोंद पाहता सलग हिमकण तयार होण्याचा विक्रम बºयाच वर्षांनंतर यावर्षी प्रथमच आला आहे, असे जाणकारांचे मत आहे. बाजरात स्ट्रॉबेरीची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. परंतु थंड वातावरण असल्यामुळे बाजारपेठेत लालफळे कमी मिळतात. ग्राहक स्टॉबेरी खरेदी करण्यासाठी गर्दी करीत आहेत.

Web Title: Mahabaleshwar has 60,000 tourists in six days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.