महाबळेश्वरमध्ये हुडहुडी वाढली, पारा २४ अंशांवर; वातावरणात कमालीचा बदल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2022 05:08 PM2022-06-02T17:08:50+5:302022-06-02T17:09:32+5:30

गेल्या काही दिवसांपासून शहरातील मुख्य बाजारपेठ, वेण्णा जलाशय तसेच विल्सन पॉंइंट परिसरात धुक्याची दुलई पसरत आहे.

Mahabaleshwar has a maximum of 24.6 degrees Celsius and a minimum of 14.5 degrees Celsius | महाबळेश्वरमध्ये हुडहुडी वाढली, पारा २४ अंशांवर; वातावरणात कमालीचा बदल

महाबळेश्वरमध्ये हुडहुडी वाढली, पारा २४ अंशांवर; वातावरणात कमालीचा बदल

Next

महाबळेश्वर : महाबळेश्वर बुधवारी मध्यरात्री झालेल्या पावसामुळे वातावरणात कमालीचा बदल झाला आहे. थंडीची तीव्रता वाढल्याने सकाळी व सायंकाळी पर्यटकांना हुडहुडी भरून आली.

हवामान विभागाने बुधवारी महाबळेश्वरचे कमाल तापमान  २४.६ तर किमान तापमान १४.५ अंश सेल्सिअस इतके नोंदविले. महाबळेश्वरच्या वातावरणात सातत्याने बदल होत आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरातील मुख्य बाजारपेठ, वेण्णा जलाशय तसेच विल्सन पॉंइंट परिसरात धुक्याची दुलई पसरत आहे.

महाबळेश्वरमधील पर्यटकांचा मुख्य हंगाम आता अंतिम टप्प्यात आला आहे. येथील निसर्गसौंदर्याचा आनंद लुटण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना थंड वातावरण, पाऊस अन‌् धुक्याचा मनमुराद आनंद घेता येत आहे. पारा अचानक खालवल्याने पर्यटकांमधून मक्याच्या कणसांना मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे.

Web Title: Mahabaleshwar has a maximum of 24.6 degrees Celsius and a minimum of 14.5 degrees Celsius

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.