महाबळेश्वर हाऊसफुल्ल : तीन दिवसांत ४५ हजार पर्यटक , देशभरातील पर्यटकांची हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 07:54 PM2018-04-30T19:54:32+5:302018-04-30T19:54:32+5:30

महाबळेश्वर : महाराष्ट्राचं नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वर व पाचगणीत गेल्या तीन दिवसांपासून पर्यटकांची रेलचेल सुरूच आहे. सलग सुट्यांमुळे तीन दिवसांत राज्यभरातील तब्बल ४५ हजार पर्यटकांनी महाबळेश्वरला भेट दिली.

 Mahabaleshwar HouseFull: 45 thousand tourists in three days, tourists' tourists all over the country | महाबळेश्वर हाऊसफुल्ल : तीन दिवसांत ४५ हजार पर्यटक , देशभरातील पर्यटकांची हजेरी

महाबळेश्वर हाऊसफुल्ल : तीन दिवसांत ४५ हजार पर्यटक , देशभरातील पर्यटकांची हजेरी

googlenewsNext
ठळक मुद्दे; कोट्यवधींची उलाढाल

महाबळेश्वर : महाराष्ट्राचं नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वर व पाचगणीत गेल्या तीन दिवसांपासून पर्यटकांची रेलचेल सुरूच आहे. सलग सुट्यांमुळे तीन दिवसांत राज्यभरातील तब्बल ४५ हजार पर्यटकांनी महाबळेश्वरला भेट दिली. जिल्'ात एकीकडे उष्णतेची लाट पसरली असताना महाबळेश्वरच्या थंड व आल्हाददायी वातावरणाचा पर्यटक मनमुराद आनंद लुटत आहेत.
पर्यटन हा महाबळेश्वर व पाचगणीच्या अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा आहे. शनिवार, रविवार, बुद्ध पौर्णिमा व कामगार दिनानिमित्त सलग लागून आलेल्या सुट्यांमुळे ही पर्यटनस्थळे पर्यटकांनी गजबजून गेली आहे. गेल्या तीन दिवसांत राज्यभरातील तब्बल ४५ हजार पर्यटकांनी महाबळेश्वर, पाचगणीला भेट दिली आहे.
महाबळेश्वरात असलेले केट्स, लॉडविक, आर्थरसीट, बॅबिग्टन, एल्फिस्टन, विल्सन आदी ब्रिटिशकालीन पॉर्इंट पर्यटकांच्या आकर्षणाचे मुख्य केंद्र आहेत. हे पॉर्इंट पर्यटकांच्या गर्दीने दिवसभर गजबजून जात आहेत. तर नौकाविहारासाठी प्रसिद्ध असलेल्या वेण्णा तलावावर पर्यटकांची सायंकाळी नौकाविहार करण्यासाठी झुंबड उडत आहे. मिनी काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाºया तापोळ्याला पर्यटक भेटी देत असून, येथील शिवसागर जलाशयातही नौकाविहार करीत आहेत.


व्यावसायिकांना अच्छे दिन
सुट्यांमुळे महाबळेश्वर पर्यटकांनी हाऊसफुल्ल झाले आहे. अनेक पर्यटकांना राहण्यासाठी हॉटेल उपलब्ध होत नसल्याने पर्यटक पाचगणी व वाई येथे मुक्काम करीत आहे. पर्यटकांचा मुख्य हंगाम सुरू झाल्याने हॉटेल व्यावसायिक, व्यापारी व स्थानिक नागरिकांना अच्छे दिन आले आहेत. गेल्या तीन दिवसांतच महाबळेश्वरात खरेदी-विक्रीतून कोट्यवधींची उलाढाल झाली.

 

Web Title:  Mahabaleshwar HouseFull: 45 thousand tourists in three days, tourists' tourists all over the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.