महाबळेश्वर हरविले धुक्यात!
By admin | Published: May 21, 2014 01:03 AM2014-05-21T01:03:34+5:302014-05-21T17:36:16+5:30
पर्यटक सुखावले : नौकाविहारासाठी वेण्णा लेकवर गर्दी
महाबळेश्वर : थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेले महाबळेश्वर शहरात दिवसभर ढगाळ वातावरण होते. मात्र सायंकाळी संपूर्ण शहर धुक्यात हरवून गेले. महाबळेश्वरमध्ये सध्या उन्हाळा, पावसाळा, हिवाळा अशा तिन्ही ऋतूंचा आनंद पर्यटक घेत आहेत. उन्हाळी हंगामातही असे आल्हाददायक वातावरण तयार झाल्याने पर्यटक सुखावले आहेत. शहरातील बाजारपेठ गजबजून जात आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी झालेला पाऊस आणि मंगळवारी सायंकाळी शहरभर पसरलेले धुके अशा रम्य वातावरणात फिरण्याचा आनंद लुटताना पर्यटक दिसत आहेत. महाबळेश्वरमध्ये सध्या गुजरात राज्यातून मोठ्या संख्येने पर्यटकांनी हजेरी लावली आहे. वेण्णा लेक येथे नौकाविहार करण्यासाठी पर्यटक गर्दी करत आहेत. बाजारपेठेत उबदार कपडे खरेदी करताना पर्यटक दिसत आहेत. तसेच सुभाष चौकात नव्याने तयार करण्यात आलेले कारंजे लक्ष वेधून घेत आहेत. तेथे फोटो काढण्यासाठी गर्दी होत आहे. (प्रतिनिधी)