महाबळेश्वर गारठले; पारा १५ अंशांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2019 11:40 PM2019-12-22T23:40:25+5:302019-12-22T23:40:46+5:30

सातारा : सातारा शहरासह जिल्ह्याचा पारा खालावू लागला असून, महाबळेश्वरातही थंडीची तीव्रता वाढू लागली आहे. रविवारी महाबळेश्वरचे किमान तापमान ...

Mahabaleshwar lost; Mercury at 4 degrees | महाबळेश्वर गारठले; पारा १५ अंशांवर

प्राण्यांना पोत्याचे स्वेटर

Next

सातारा : सातारा शहरासह जिल्ह्याचा पारा खालावू लागला असून, महाबळेश्वरातही थंडीची तीव्रता वाढू लागली आहे. रविवारी महाबळेश्वरचे किमान तापमान १५ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले. गेल्या वर्षी १२ डिसेंबरला याठिकाणी दवबिंदू गोठल्याने हिमकण पाहावयास मिळाले होते. यंदा तापमानात सतत बदल होत असल्याने पर्यटकांना हिमकण पाहण्यासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
सातारा शहराच्या वातावरणात रविवारी अचानक बदल झाला. दिवसभर ढगाळ वातावरण राहिल्याने सायंकाळी थंडीची तीव्रता अधिक जाणवली. रविवारी शहराचे कमाल तापमान ३०, तर किमान तापमान १६ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. थंडीत वाढ होऊ लागल्याने शहरी तसेच ग्रामीण भागात शेकोट्या पेटू लागल्या असून, उबदार कपड्यांनाही मागणी वाढू लागली आहे.
थंड हवेचे ठिकाण असलेल्या महाबळेश्वरचा पाराही हळूहळू खालावू लागला आहे. तालुक्याचे यंदाच्या हंगामातील नीचांकी तापमान गुरुवारी (दि. १९) १३.४ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले आहे. रविवारीही १५ अंश सेल्सिअसवर पारा स्थिरावला. तापमान तीन ते चार अंशांवर येताच वेण्णा जलाशय, लिंगमळा परिसरात दवबिंदू गोठण्याची प्रक्रिया सुरू होते. गेल्या वर्षी १२ डिसेंबरला दवबिंदू गोठल्याने सर्वत्र पांढऱ्या शुभ्र हिमकणांची चादर पसरली होती. यंदा तापमानात सतत चढ-उतार होत असल्याने सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आलेल्या पर्यटकांना हिमकणांची प्रतीक्षा लागून राहिली आहे. सध्या येथील गुलाबी थंडीचा पर्यटक मनमुराद आनंद लुटत आहेत.
महाबळेश्वरचे तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)
दिनांक कमाल किमान
१८ डिसेंबर २४.४ १३.७
१९ डिसेंबर २५ १३.४
२० डिसेंबर २५.२ १३.८
२१ डिसेंबर २४ १५.८
२२ डिसेंबर २३.३ १५
प्राण्यांना पोत्याचे स्वेटर
सध्या थंडीचा कडाका वाढत चालला आहे. रात्रीच्या वेळी व पहाटे थंडीचे प्रमाण जास्त आहे. थंडीपासून बचावासाठी लोकं स्वेटर, कानटोप्या, स्कार्फ तसेच झोपताना गरम ब्लँकेट्सचा वापर करतात. परंतु पक्षी, प्राणी थंडीपासून आपला बचाव कसा करत असतील! आपल्या जनावरांच्या गोठ्यात लहानसं रेडकू थंडीने कुडकुडत असलेले साहिल गोरे या विद्यार्थ्याने पाहिले व त्याने स्वकल्पनेतून रेडकासाठी चक्क पोत्याचे स्वेटर बनविले आहे.

Web Title: Mahabaleshwar lost; Mercury at 4 degrees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.