महाबळेश्वर तालुक्यातील निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:33 AM2021-01-14T04:33:01+5:302021-01-14T04:33:01+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क महाबळेश्वर : महाबळेश्वर तालुक्यातील १४ ग्रामपंचायतींच्या ४९ जागांसाठी १५ जानेवारीला मतदान होणार आहे. मतदान प्रक्रिया शांततेत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
महाबळेश्वर : महाबळेश्वर तालुक्यातील १४ ग्रामपंचायतींच्या ४९ जागांसाठी १५ जानेवारीला मतदान होणार आहे. मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी १५० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे,’ अशी माहिती तहसीलदार सुषमा चौधरी-पाटील यांनी दिली.
महाबळेश्वर तालुक्यातील ४२ ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर झाली होती. यामधील २८ ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध पार पडली. उर्वरित १४ ग्रामपंचायतीमधील ४९ जागांसाठी ८३ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. तर या १४ ग्रामपंचायतींपैकी ५ गावाच्या पूर्ण तर उर्वरित ९ ग्रामपंचायतींच्या अंशत: जागांसाठी मतदान घेण्यात येणार आहे. यासाठी ३० मतदान बूथ उभारण्यात येणार आहेत. तर १५० शासकीय कर्मचारी सज्ज झाले आहेत. यामध्ये तहसील कार्यालयातील १६ कर्मचारी, ४ शिपाई, ११ तलाठी व दोन मंडलाधिकाऱ्यांचा समावेश आहे. मतदान प्रक्रियेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी सर्व मतदान केंद्रावर कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे, अशी माहितीही तहसीलदार सुषमा चौधरी-पाटील यांनी दिली.
चौकट :
शिवसागर जलाशय पार करावा लागणार...
आता १४ ग्रामपंचायतींसाठी मतदान घेण्यात येणार आहे. त्यामधील आकल्पे व वाळणे या दोन ग्रामपंचायती दुर्गम भागात आहेत. या भागात जाण्यासाठी शिवसागर जलाशय पार करून जावे लागणार आहे. यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी व इतर कर्मचारी हे एक दिवस अगोदरच मतदान साहित्य घेऊन रवाना होणार आहेत. यासाठी तराफा व इतर वाहनांची सोय करण्यात आली आहे. .....................................................