महाबळेश्वरला पर्यटक पाऊस सरीच्या प्रेमात !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2018 01:06 PM2018-06-11T13:06:07+5:302018-06-11T13:06:07+5:30
महाबळेश्वरमध्ये मान्सून सक्रीय झाला असून शहर व परिसरात सरी वर सरी कोसळत आहेत. त्यातच शहरात जून हंगामामध्ये हौसी पर्यटक मोठ्या प्रमाणात आलेले आहेत. पावसात भिजण्याचा आनंद लुटण्यासाठी एका हातात गरमा गरम कणीस तर कोणी थंड आईस्क्रीम, बर्फाचा कलरफुल फेमस गोळा गडद धुक्यात व पावसात खाताना दिसून येत आहेत. तसेच फॅमिलीचा सेल्फी फोटोही काढण्यात अनेकजण दंग होत आहेत. एकूणच महाबळेश्वरमध्ये पावसाचा आनंद घेण्यात येत आहे.
महाबळेश्वर : महाबळेश्वरमध्ये मान्सून सक्रीय झाला असून शहर व परिसरात सरी वर सरी कोसळत आहेत. त्यातच शहरात जून हंगामामध्ये हौसी पर्यटक मोठ्या प्रमाणात आलेले आहेत.
पावसात भिजण्याचा आनंद लुटण्यासाठी एका हातात गरमा गरम कणीस तर कोणी थंड आईस्क्रीम, बर्फाचा कलरफुल फेमस गोळा गडद धुक्यात व पावसात खाताना दिसून येत आहेत. तसेच फॅमिलीचा सेल्फी फोटोही काढण्यात अनेकजण दंग होत आहेत. एकूणच महाबळेश्वरमध्ये पावसाचा आनंद घेण्यात येत आहे.
पावसाचे माहेरघर महाबळेश्वर हे महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्राचे नंदनवन, थंड हवेचे ठिकाण असणारे महाबळेश्वर पर्यटकांच्या पसंतीचे ठिकाण असल्याने पर्यटक या शहराच्या प्रेमात पडतात. आता उन्हाळी हंगाम संपताच महाबळेश्वरकरांसह पर्यटकांना वेध लागले आहेत ते येथील पावसाचे. कारण येथे धुवाँधार पाऊस पडतो.
जून, जुलै आणि आॅगस्ट या महिन्यांमध्ये तर महाबळेश्वरमध्ये सूर्यदर्शनच होत नाही. आता या नगरीचे स्वरूप हंगामी राहिले नसून बारमाही झाले आहे. कारण येथे येणारे पर्यटक आता पावसाळ्यामध्ये देखील निसर्गसौंदर्याचा अनुभव घेण्यासाठी येतात.
पावसाळ्यातील महाबळेश्वर म्हणजे अप्रतिम निसर्गसौंदर्य, आल्हाददायक वातावरण, जोडीला धुके व मुसळधार पावसाची साथ, डोंगररांगांमधून अविरत वाहणारे धबधबे अशा वातावरणामध्ये पर्यटक गुंग होऊन जातात. सध्या पावसाळा अनुभवण्यासाठी येथे पर्यटक आले आहेत.