महाबळेश्वर अर्बनचा १०४ कोटींचा व्यवसाय : धोत्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:39 AM2021-03-31T04:39:37+5:302021-03-31T04:39:37+5:30

महाबळेश्वर : महाबळेश्वर अर्बन बॅंकेने आर्थिक वर्षात १०४ कोटींचा व्यवसाय केला आहे, अशी माहिती अर्बन बँकेचे अध्यक्ष सचिन धोत्रे ...

Mahabaleshwar Urban's business worth Rs 104 crore: Dhotre | महाबळेश्वर अर्बनचा १०४ कोटींचा व्यवसाय : धोत्रे

महाबळेश्वर अर्बनचा १०४ कोटींचा व्यवसाय : धोत्रे

Next

महाबळेश्वर : महाबळेश्वर अर्बन बॅंकेने आर्थिक वर्षात १०४ कोटींचा व्यवसाय केला आहे, अशी माहिती अर्बन बँकेचे अध्यक्ष सचिन धोत्रे यांनी दिली.

बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. यावेळी उपाध्यक्ष नंदकुमार वायदंडे व संचालक उपस्थित होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वार्षिक सभा ऑनलाईन घेण्यात आली.

सचिन धोत्रे म्हणाले, बँकेने ३७ कोटींचे कर्ज वाटप केले आहे. बँकेच्या ठेवी ६६ कोटी ८६ लाखांवर पोहोचल्या आहेत. राखीव निधीसह इतर सर्वच निधींमध्ये वाढ झाली आहे. भविष्यात सभासदांना अत्याधुनिक डिजिटल सेवा पुरविणार आहे.

माजी अध्यक्ष राजेश कुंभारदरे यांचे यावेळी भाषण झाले. सभेस संचालक बाळासाहेब कोंढाळकर, सी. डी. बावळेकर, युसूफ शेख, वृषाली डोईफोडे, संगीता तोडकर, जावेद वलगे, दिलीप रिंगे, इरफान शेख, बाबूराव कात्रट, गजानन फळणे, संजय जंगम, महाव्यवस्थापक बाळकृष्ण साळुंखे उपस्थित होते. (वा. प्र.)

फोटो ३०महाबळेश्वर अर्बन बँकेचे अध्यक्ष सचिन धोत्रे यांनी बँकेच्या कार्याचा आढावा घेतला.

Web Title: Mahabaleshwar Urban's business worth Rs 104 crore: Dhotre

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.