सातारा शहरात आज महालसीकरण शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:44 AM2021-09-21T04:44:23+5:302021-09-21T04:44:23+5:30
सातारा : जिल्हा परिषद व सातारा नगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने सातारा शहरात दि. २१ रोजी महालसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले ...
सातारा : जिल्हा परिषद व सातारा नगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने सातारा शहरात दि. २१ रोजी महालसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील एकूण १३ केंद्रांवर सकाळी ९ ते ६ या वेळेत नोंदणी व लसीकरण होणार आहे. शिबिराच्या माध्यमातून १८ वर्षांवरील सुमारे आठ हजार नागरिकांना कोविशिल्ड लस दिली जाणार आहे. नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन नगराध्यक्षा माधवी कदम, उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, आरोग्य सभापती अनिता घोरपडे व मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी केले आहे.
(चौकट)
आवश्यक कागदपत्रे
लसीकरणाकरिता कोणत्याहीप्रकारची पूर्वनोंदणी आवश्यक नाही. जागेवरच नोंदणी करून लस दिली जाणार आहे. मात्र, लसीकरणाकरिता येताना आधारकार्ड व सध्या सुरू असलेला मोबाईल क्रमांक असणे आवश्यक आहे.
(चौकट)
या १३ केंद्रांवर होईल लसीकरण :
नगरपालिका ग्रंथालय (सदरबझार)
नगरपालिका कार्यालय (सदरबझार)
नागरी आरोग्य केंद्र (गोडोली)
नागरी आरोग्य केंद्र (कस्तुरबा, राजवाडा)
समाजमंदिर (रविवार पेठ)
कुपर कॉलनी सांस्कृतिक कार्यालय, कुपर कॉलनी,
पुष्करणी क्लिनिक (अजिंक्यतारा रस्ता, शाहूनगर)
महाजनवाडा सांस्कृतिक कार्यालय (मंगळवार पेठ)
नगरपालिका मंगल कार्यालय (केसरकर पेठ)
मेडिटेशन हॉल (चिमणपुरा पेठ)
भवानी हायस्कूल
श्रीपतराव पाटील हायस्कूल (करंजे पेठ)
शनिवार पेठ समाजमंदिर (राजलक्ष्मी टॉकीजमागे)