सातारा जिल्ह्यातील सोनगाव तर्फ येथे ९५ लाखांची रोख रक्कम जप्त

By दीपक देशमुख | Published: November 5, 2024 12:48 PM2024-11-05T12:48:54+5:302024-11-05T12:50:37+5:30

पोलीस विभाग व भरारी पथकाची संयुक्त कारवाई

Maharashtra assembly vidhan sabha election 2024 95 lakh cash seized at Songaon Tarap in Satara district | सातारा जिल्ह्यातील सोनगाव तर्फ येथे ९५ लाखांची रोख रक्कम जप्त

सातारा जिल्ह्यातील सोनगाव तर्फ येथे ९५ लाखांची रोख रक्कम जप्त

सातारा : सोनगाव तर्फ, ता. सातारा येथे पोलिस विभाग आणि भरारी पथक यांनी संयुक्त कारवाई करत ९५ लाखांची रोकड जप्त केली. ही रोकड एका व्यापाऱ्याची असल्याचे प्रथमदर्शनी समजत असून प्रशासनाकडून सखोल चौकशी करण्यात येत आहे.

विधानसभा निवडणुकीचे धुमशान सुरू असताना प्रशासनाकडूनही आचारसंहितेचा भंग होवू नये, यासाठी दक्षता घेतली जात आहे. निवडणूक काळात अवैधरित्या रोख रकमेची वाहतूक व देवाण-घेवाण होवू नये, यासाठी भरारी पथके तैनात केली आहेत. तपासणी नाक्यावर वाहनांची कडक तपासणी केली जात आहे.

दरम्यान, मंगळवारी शेंद्रेजवळील सोनगाव तर्फ येथे एमएच ४८ सीटी ५२३९ या चार चाकी वाहनाची पथकाने तपासणी केली. यावेळी ९५ लाख रुपयांची रोकड आढळून आली. पथकाने रक्कम जप्त केली असून ती एका व्यापाऱ्याची आहे. याबाबतचा अधिक चौकशी करण्यात येत आहे.

प्रांताधिकारी सुधाकर भोसले, उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार नागेश गायकवाड, सातारा तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांच्या नेतृत्वाखाली प्रशासन अणि पोलिस यांच्या भरारी पथकाने संयुक्तरित्या कारवाई केली.

Web Title: Maharashtra assembly vidhan sabha election 2024 95 lakh cash seized at Songaon Tarap in Satara district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.