सातारा जिल्ह्यात कोरगावात चुरशीने मतदान सुरू, माणमध्ये सर्वात कमी
By दीपक देशमुख | Updated: November 20, 2024 12:24 IST2024-11-20T12:21:20+5:302024-11-20T12:24:24+5:30
सातारा : सातारा जिल्ह्यात आठही मतदार संघात सकाळी ७ वाजता मतदान प्रक्रियेस पारंभ झाला. सकाळी ७ ते ११ अशा ...

सातारा जिल्ह्यात कोरगावात चुरशीने मतदान सुरू, माणमध्ये सर्वात कमी
सातारा : सातारा जिल्ह्यात आठही मतदार संघात सकाळी ७ वाजता मतदान प्रक्रियेस पारंभ झाला. सकाळी ७ ते ११ अशा चार तासात १८.७२ टक्के मतदान झाले. कोरेगावात चुरशीने मतदान सुरू असून २१.२४ टक्के मतदान झाले आहे. माणमध्ये संथगतीने मतदान सुरू आहे.
सातारा जिल्ह्यात उमेदवारांच्या प्रतिनिधींसमोर सकाळी ७ वाजता मतमोजणीस प्रारंभ झाला. पहिल्या दोन तासात सकाळी ७ ते ९ या वेळेत फलटणला ४.२९ टक्के, वाई ४.९२, कोरेगाव ६.९३, माण ३.३८, कऱ्हाड उत्तर ४.८४, कऱ्हाड दक्षिण ५.६३, पाटण ६.६८, सातारा ६.१८ टक्के मतदान झाले.
सकाळी ९ ते ११ या वेळेत १८.७२ टक्के मतदान झाले. फलटणला १७.९८ टक्के, वाई १८.५५ , कोरेगाव २१.२४, माण १५.२१, कऱ्हाड उत्तर १८.५७, कऱ्हाड दक्षिण १९.७१, पाटण १८.९३, सातारा १९.९७ टक्के मतदान झाले.
खासदार उदयनराजे भोसले यांनी साताऱ्यात अनंत इंग्लिश स्कूल येथील केंद्रावर तर आमदार शिवेंद्रराज भोसले यांनी कोटेश्वर येथील मतदान केंद्रावर कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला.
सातारा जिल्ह्यात विधानसभेचे आठ मतदारसंघ आहेत. या मतदारसंघात एकूण १०९ उमेदवार रिंगणात आहेत. यातील तब्बल ५७ जणांनी अपक्ष म्हणून दंड थोपटले आहेत. तरीही महाविकास आघाडी आणि महायुतीतच खरा सामना आहे; पण पाटण आणि वाईत आघाडी आणि युतीत बंडखोरी झाल्याने दोन्ही अपक्षांनी गणिते बिघडवली आहेत.