साताऱ्यात उमेदवारांच्या प्रचारासाठी सोशल मीडिया इन्फ्लुवेन्सर आघाडीवर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2024 04:21 PM2024-11-12T16:21:57+5:302024-11-12T16:22:27+5:30
सातारा : पत्रके, जाहीर सभा, कोपरासभा प्रभातफेरी या सर्वां इतकच सध्या सोशल मीडियावर रिल्स विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांना थेट मतदारांपर्यंत ...
सातारा : पत्रके, जाहीर सभा, कोपरासभा प्रभातफेरी या सर्वां इतकच सध्या सोशल मीडियावर रिल्स विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांना थेट मतदारांपर्यंत पोहोचण्याची नामी संधी उपलब्ध करून देत आहे. स्थानिक रिल्स स्टार्सला सोबत घेऊन कोलाब्रेशनमध्ये रिल करून सोशल मीडियावर या उमेदवारांचा प्रचार जोरकसपणे सुरू झाला आहे.
पक्षांच्या उमेदवारांचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. काही लढती लक्षवेधी आहेत त्यातील प्रमुख उमेदवारांची प्रचार यंत्रणा सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर करत आहे. दिवसभरात उमेदवारांनी केलेल्या संपर्क दौऱ्याबरोबरच मतदारांना भावेल अशा विकासकामांच्या रिलीज करण्याकडे उमेदवारांचा कल दिसतो. व्यस्त दिनचर्येतून वेळ काढून या रिल्स स्टारसोबत रिल्स करून त्या माध्यमातून मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी उमेदवार प्रयत्नशील आहेत.
ट्रॉलरचाही घेतला जातोय समाचार
कमी कालावधीत मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी सोशल मीडिया अत्यंत प्रभावशाली माध्यम राजकीय नेत्यांना वाटत आहे. मात्र, त्याचा वापर काही उमेदवार विरोधकांची प्रतिमा मलीन करण्यासाठी करत आहेत. या ट्रॉलधाडीकडे लक्ष देण्यासाठी व त्यांचा समाचार घेण्यासाठी राजकीय नेत्यांनी स्वतंत्र यंत्रणा उभी केली आहे.
स्थानिक इन्फ्लुएन्सरला संधी
आपल्या भागातील प्रश्नांबाबत जाण असल्यामुळे उमेदवार स्थानिक सोशल मीडिया इन्फ्लुअन्सरला आपल्या प्रचारामध्ये सामावून घेत आहेत. विकासकामांच्या आधारावर व्हिडिओ करून ते समाजमाध्यमांवर अपलोड करून त्याद्वारे मतदारांपर्यंत थेट पोहोचण्याची संधी यामुळे मिळते. स्थानिक इन्शुरन्सरचे असलेले लाखो फॉलोवरपर्यंत पोहोचण्यासाठी हे माध्यम उमेदवारांना अधिक भावले आहे.
सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरना यंदा आपल्या भागातील उमेदवारांचे काम दर्शविण्याची संधी मिळाली आहे स्थानिक पातळीवर नेटिझन्सला काय बघायला आवडते याचा अभ्यास असल्यामुळे कन्टेन्टविषयी उमेदवाराला फार चर्चा करावी लागत नाही स्थानिकांना यात समाविष्ट करून घेतल्यामुळे थेट मतदारांपर्यंत पोहोचायला उमेदवारांना तयार प्लॅटफॉर्म मिळत आहे. - रमाकांत देशपांडे, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर