Maharashtra Election 2019: नरेंद्र मोदी 'आयर्न मॅन', उदनयराजेंकडून मोदींना सरदार पटेलांची उपमा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2019 04:06 PM2019-10-17T16:06:34+5:302019-10-17T16:08:01+5:30
Maharashtra Election 2019: उदयनराजेंनी नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सर्व टीमचे अभिनंदन करावं तेवढं कमी असल्याचे म्हटले.
मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी साताऱ्यातील उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा घेतली. भाजपाचे विधानसभा उमेदवार शिवेंद्रराजे भोसले आणि लोकसभा पोटनिवडणुकीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्यासाठी सभेला संबोधित केले. त्यावेळी, कलम 370 हटविल्यानंतर संपूर्ण देशाने मोदींना पाठिंबा दिल्याचे सांगताना, मोदी हे आधुनिक भारताचे लोहपुरुष असल्याचे उदयनराजेंनी म्हटले.
उदयनराजेंनी नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सर्व टीमचे अभिनंदन करावं तेवढं कमी असल्याचे म्हटले. तसेच, कलम 370 वर का बोलायंच नाही, असे म्हणत 370 हटविण्याचा निर्णय हा केवळ महाराष्ट्रालाच नाही, तर देशातील प्रत्येक राज्याला विचार करायला लावणारा असल्याचे म्हटले. काँग्रेसचे सरकार असताना, जर त्यांनी हा निर्णय घेतला असता, तर कित्येक सैन्यांचं बलिदान द्याव लागलं नसतं, असेही उदयनराजेंनी म्हटलंय. तसेच, शेतकऱ्यांसाठी भारतात इरमा योजना लागू करण्याची मागणीही मोदींकडे केली.
उदयनराजेंनी आपल्या भाषणा स्थानिक मुद्द्यांपासून ते राष्ट्रीय स्तरावरील मुद्दयांवर भाष्य केले. तसेच, काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारवर टीका करताना, या सरकारने मोठा भ्रष्ठाचार केल्याचेही सांगितले. मी भाजपात जाण्याचा निर्णय घेताना, मी माझ्या सहकाऱ्यांना विश्वासात घेतलं. तसेच, मी माझ्या मनालाही विचारलं, माझ्या मनाने मला जे सांगितलं ते मी केलं. म्हणूनच मी आज भाजपात आहे. कारण, मोदींचं नेतृत्व मला मान्य असल्याचे उदयनराजेंनी म्हटले.