महाराष्ट्र केसरीचा कार्यक्रम जाहीर, मानाच्या गदेसाठीची लढत कधी होणार? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2022 04:37 PM2022-03-30T16:37:23+5:302022-03-30T16:38:13+5:30

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेतर्फे ६४ वी वरिष्ठ गट गादी व माती राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा व महाराष्ट्र केसरी किताब लढत ५ ते ९ एप्रिल या कालावधीमध्ये श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलात होणार आहेत.

Maharashtra Kesari program announced, The competition will be held at the rich Chhatrapati Shahu District Sports Complex in Satara | महाराष्ट्र केसरीचा कार्यक्रम जाहीर, मानाच्या गदेसाठीची लढत कधी होणार? जाणून घ्या

महाराष्ट्र केसरीचा कार्यक्रम जाहीर, मानाच्या गदेसाठीची लढत कधी होणार? जाणून घ्या

Next

सातारा : येथे आयोजित केलेल्या राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा व महाराष्ट्र केसरी किताब लढतीसाठीचा कार्यक्रम महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद, पुणेतर्फे जाहीर करण्यात आला आहे, अशी माहिती बाळासाहेब लांडगे यांनी दिली.

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेतर्फे ६४ वी वरिष्ठ गट गादी व माती राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा व महाराष्ट्र केसरी किताब लढत ५ ते ९ एप्रिल या कालावधीमध्ये श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलात होणार आहेत.

या स्पर्धेचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. मंगळवार, दि. ५ एप्रिल रोजी पंचांचे आगमन, उजळणी वर्ग, सर्व शहर जिल्हा संघांचे आगमन, कुस्तीगीरांची वैद्यकीय तपासणी व वजने केली जातील. बुधवार, दि. ६ रोजी ५७ ते ९२ किलो वजन गटातील स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ होईल. त्यानंतर ६१, ८६ व महाराष्ट्र केसरी गादी व माती विभाग कुस्तीगीरांचे वजन मोजमाप, वैद्यकीय तपासणी व त्यानंतर सायंकाळी ४ पासून स्पर्धा होईल.

गुरुवार, दि. ७ रोजी ६१, ८६ किलो वजनी गटातील विजेत्यांना बक्षीस वितरण होईल. त्यानंतर ७४ व ९७ किलो वजनी गटातील कुस्तीगीरांचे वजन मोजमाप, वैद्यकीय तपासणी व त्यानंतर सायंकाळी ४ वाजता स्पर्धा पार पडेल. शुक्रवार, दि. ८ रोजी ७४ व ९७ किलो वजनी गटातील विजेत्यांना बक्षीस वितरण होईल. शनिवार, दि, ९ एप्रिल राेजी अंतिम फेरी, रिपेचेस व बक्षीस समारंभ होईल, स्पर्धेच्या अनुषंगाने बंकट यादव, ललित लांडगे, दिनेश गुंड, सुधीर पवार हे नियोजन करत आहेत.

असा आहे कार्यक्रम-

५ एप्रिल : कुस्ती स्पर्धा ५७, ७० व ९२ किलो वजनी गट सायंकाळी ४ वाजता.

६ एप्रिल : ६१, ८६ वजनी गटातील कुस्ती स्पर्धा.

७ एप्रिल : ७४, ९७ किलो वजनी गटातील कुस्ती स्पर्धा.

८ एप्रिल : ६५, ७९ किलो वजनी गटातील कुस्ती.

९ एप्रिल : सायंकाळी ४ वाजता महाराष्ट्र केसरीच्या मानाच्या गदेसाठी स्पर्धा.

Web Title: Maharashtra Kesari program announced, The competition will be held at the rich Chhatrapati Shahu District Sports Complex in Satara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.