राष्ट्रीय शालेय बास्केटबॉल ; उप-उपांत्यपूर्व फेरीत महाराष्ट्राची बाजी-: ओडिसावर ५४-४० ने मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2019 07:23 PM2019-12-13T19:23:52+5:302019-12-13T19:28:07+5:30
या राष्ट्रीय शालेय बास्केटबॉल स्पर्धेमध्ये देशातील ३० राज्यांतील संघाच्या ३६५ खेळाडूंनी सहभाग घेतला. तसेच यात ६० क्रीडा मार्गदर्शक, संघव्यवस्थापकांचाही सहभाग आहे. राष्ट्रीय शालेय बास्केटबॉल स्पर्धेच्या उप-उपांत्यपूर्व फेरीत एकूण आठ सामने झाले.
सातारा : सातारा येथे झालेल्या उप-उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यांमध्ये महाराष्ट्राच्या संघाने उत्कृष्ट कामगिरी करत ओडिसा राज्यावर ५४-४० अशा गुणांनी दणदणीत विजय मिळविला. महाराष्ट्र राज्य अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा परिषद व के. एस. डी. शानभाग विद्यालय व ज्युनिअर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यामाने ६५ वी राष्ट्रीय शालेय बास्केटबॉल (१७ वर्षांखालील मुली) क्रीडा स्पर्धेचे आयोजन शानभाग विद्यालयात करण्यात आले आहे.
या राष्ट्रीय शालेय बास्केटबॉल स्पर्धेमध्ये देशातील ३० राज्यांतील संघाच्या ३६५ खेळाडूंनी सहभाग घेतला. तसेच यात ६० क्रीडा मार्गदर्शक, संघव्यवस्थापकांचाही सहभाग आहे. राष्ट्रीय शालेय बास्केटबॉल स्पर्धेच्या उप-उपांत्यपूर्व फेरीत एकूण आठ सामने झाले. यात महाराष्ट्र संघाने चांगली कमागिरी करत ओडिसा संघावर ५४-४० गुणांनी विजय मिळविला. तसेच दुसरा सामना के. व्ही. एस. विरुद्ध तामिळनाडू यांच्यात झाला.
यात के. व्ही. एस. संघाने ६२ गुण मिळविले. तर तामिळनाडूच्या संघाने ८९ गुण मिळवून के. व्ही. एस. संघावर मात केली. तिसऱ्या समान्यात छत्तीसगड संघाविरुद्ध दिल्ली संघ समोरासमोर आले होते. यात दिल्ली संघाने फक्त २७ गुण मिळवले आणि छत्तीसगडच्या संघाने ६९ गुण मिळवून दिल्लीला पराभूत केले. दरम्यान, चौथा सामना राजस्थान संघाविरुद्ध केरळ यांच्यात रंगला. हा संपूर्ण सामना अटीतटीचा झाला.
यात केरळ संघाने ४७ गुण मिळविले, तर राजस्थान संघाने ४८ गुण मिळवून यश संपादन केले. पाचवा सामना पंजाब विरुद्ध सी. बी. एस. बी. डब्ल्यू. एस. ओ. यांच्यात झाला. यात सी. बी. एस. बी. डब्ल्यू. एस. ओ. संघाने १५ गुण मिळविले. तर पंजाब संघाने ३८ गुण मिळवून दमदार कामगिरी केली. सहावा सामना चंदिगढ संघाविरुद्ध हरियाणा संघात झाला. यात चंदिगढ संघाला केवळ १४ गुण मिळविण्यात आले. हरियाणा संघाने एकूण ४४ गुण मिळवित यश संपादन केले.
सातव्या सामना आय. पी. एस. सी. विरुद्ध सी. आय. एस. बी. सी संघात रंगला. यात आय. पी. एस. सी. संघाने फक्त २९ गुण मिळविले. तर सी. आय. एस. बी. सी. संघाने ४७ गुणाने बाजी मारली. आठवा सामना उत्तरप्रदेश संघ विरुद्ध कर्नाटक यांच्यात झाला. यात उत्तरप्रदेश संघाने २४ गुण मिळविले. तर कर्नाटकच्या संघाने ३४ गुण मिळवित यश संपादन केले.
शनिवारी अशी फेरी
सकाळच्या सत्रात उपांत्य सामना, सायंकाळी अंतिम सामना तर तिसºया क्रमांकाकरिता सामने होणार आहेत. तरी अंतिम सामन्यांची लढत रोमांचक होणार आहे.
-युवराज नाईक, जिल्हा क्रीडा अधिकारी