मायणी परिसरात महाशिवरात्री भक्तिभावाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 05:11 AM2021-03-13T05:11:03+5:302021-03-13T05:11:03+5:30

मायणी : मायणी व मायणी परिसरातील विविध गावांमध्ये शुक्रवारी महाशिवरात्री आरती, अभिषेक व प्रसाद वाटप आदी धार्मिक कार्यक्रमांसह मोठ्या ...

Mahashivaratri in Mayani area with devotion | मायणी परिसरात महाशिवरात्री भक्तिभावाने

मायणी परिसरात महाशिवरात्री भक्तिभावाने

Next

मायणी : मायणी व मायणी परिसरातील विविध गावांमध्ये शुक्रवारी महाशिवरात्री आरती, अभिषेक व प्रसाद वाटप आदी धार्मिक कार्यक्रमांसह मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली.

येथील चांद नदीच्या काठावर प्राचीन हेमाडपंती महादेव मंदिर (संगमेश्वर मंदिर) या ठिकाणी मंदिराचे पुजारी बाबा महाराज पाटोळे व त्यांचे कुटुंबीय, स्वामी व भक्तांच्या उपस्थितीत अभिषेक आरती देण्यात आली. दिवसभर येणाऱ्या भाविकांना बाबा महाराज पाटोळे व विजय परदेशी यांच्याकडून प्रसादाचे वाटप करण्यात येत होते. तसेच येणाऱ्या भाविकांकडून केळी व इतर प्रसादाचे पदार्थ बाबा महाराजांकडे देेण्यात येत होते.

विखळे येथील प्राचीन हेमाडपंती महादेव मंदिरात भाविकांकडून धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. चितळी-पवारमळा येथील महादेव मंदिरात आरती, अभिषेक प्रसादाचे वाटप करण्यात आले. तसेच सर्वच ठिकाणी दिवसभर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घालून दिलेल्या नियमांचे पालन करण्यात येत होते.

Web Title: Mahashivaratri in Mayani area with devotion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.